शशांक केतकरनंतर त्याची बहीणही करते छोट्या पडद्यावर एंट्री, या मालिकेत झळकणार दीक्षा केतकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2021 15:12 IST2021-02-17T15:10:22+5:302021-02-17T15:12:40+5:30
शशांकच्यापाठोपाठ त्याची धाकटी बहीणही अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. दीक्षा केतकरची ही पहिलीच मालिका असल्यामुळे तिच्यासाठी हा क्षण नक्कीच खास असणार.

शशांक केतकरनंतर त्याची बहीणही करते छोट्या पडद्यावर एंट्री, या मालिकेत झळकणार दीक्षा केतकर
'होणार सून मी या घरची’ ह्या मालिकेमधून शशांकला प्रत्येक घरात ‘श्री’ अशी ओळख मिळाली. या मालिकेला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून धरलं होत आणि त्यातली सगळीच पात्र प्रेक्षकांच्या भरपूर पसंतीस उतरली होती.या मालिकेमुळे शशांकला तुफान लोकप्रियता मिळाली. आजही शशांकला ‘श्री’ म्हणूनच चाहते जास्त ओळखतात. शशांतक केतकर पुन्हा एकदा रसिकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. 'पाहिले ना मी तुला' या मालिकेतून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
शशांकच्यापाठोपाठ त्याची धाकटी बहीणही अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. दीक्षा केतकरची ही पहिलीच मालिका असल्यामुळे तिच्यासाठी हा क्षण नक्कीच खास असणार आहे. नुकताच या मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांना पाहायला मिळाला. या मालिकेमध्ये एक नवीन, बोलक्या डोळ्यांचा आणि ताजा चेहरा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे आणि तो आहे दीक्षा केतकर या अभिनेत्रीचा.
दीक्षाची ही पहिलीच मालिका आहे. दीक्षाबरोबरच या मालिकेमध्ये हरीश दुधाडे, ज्योती चांदेकर, रोहित फाळके, गुरु दिवेकर आणि प्रिया करमरकर हे कलाकारही आहेत. या प्रोमोमध्ये दीक्षा खूप निरागस आणि हसरी दिसते आहे.
या नव्या चेहऱ्याला पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. वयानी खूप मोठ्या असणाऱ्या व्यक्तीबरोबर ऐश्वर्या का लग्न करते आणि जाधव घराण्याची सून कशी होते, हे पाहणं खूप उत्सुकतेचं असणार आहे. मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल.