शशांक खेतानच्या आई-वडिलांनी दिली हि प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2018 02:46 PM2018-06-28T14:46:44+5:302018-06-28T15:13:13+5:30

डान्स दिवानेच्या नुकताच झालेला एपिसोड कुटुंब विशेष एपिसोड होता आणि डान्स दिवानेच्या कर्मचाऱ्यांनी तो शशांक खेतानसाठी विशेष बनवला होता.

Shashank Khetan's parents gave this reaction | शशांक खेतानच्या आई-वडिलांनी दिली हि प्रतिक्रिया

शशांक खेतानच्या आई-वडिलांनी दिली हि प्रतिक्रिया

googlenewsNext
ठळक मुद्देशशांकचे आईवडील आणि सासूसासरे त्याच्या शोवर आले होते आणि त्याला आश्चर्यचकित केले होते

कलर्सचा नवीन प्रस्ताव डान्स दिवाने हा एक वैशिष्ट्यपूर्ण शो असून त्याने लाखो लोकांची मने जिंकली आहेत. या शो मध्ये संपूर्ण भारतातील 3 पिढ्यांना एका मंचावर येऊन त्यांचे कौशल्य सादर करण्याची संधी दिली आहे. प्रत्येक श्रेणीतील एक असे तीन फिनॅलिस्ट भारताच्या अतुलनीय डान्स दिवाने साठी लढत देतील. या शोचे परीक्षण केले आहे अतिशय कुशल माधुरी दिक्षीत नेने, शशांक खेतान आणि तुषार कालिया यांनी.  डान्स दिवानेच्या नुकताच झालेला एपिसोड कुटुंब विशेष एपिसोड होता आणि डान्स दिवानेच्या कर्मचाऱ्यांनी तो शशांक खेतानसाठी विशेष बनवला होता. शशांकचे आईवडील आणि सासूसासरे त्याच्या शोवर आले होते आणि त्याला आश्चर्यचकित केले होते. शशांकच्या आईने सेटवर सांगीतले की, “शशांक लहानपणी अतिशय खोडकर होता आणि तो कधीही सरळमार्गावर चालत नसे. तो झाडांवर, भिंतीवर आणि गेटवर चढत असे आणि मला येताना बघितले की उडी मारत असे. त्याच्या लहानपणी त्याने आम्हाला खूप त्रास दिला आहे पण आता आम्हाला त्याचा अभिमान वाटत आहे.”

आधीच्या डान्स शोमधील फापटपसारा वगळून टाकत, या विशिष्ट शो ने डान्सची अतिशय आवड असणाऱ्या लोकांना त्यांचे कौशल्य दाखविण्यासाठी एक मंच दिला आहे. मुले, तरुण आणि प्रौढ अशा 3 वयोगट असणाऱ्या सर्व स्पर्धकांना त्यांच्या स्वतःच्या श्रेणीतील लोकांशी लढत द्यायची आहे. प्रत्येक श्रेणीतील एक असे तीन फिनॅलिस्ट भारताच्या अंतिम डान्स दिवाने साठी लढत देणार आहेत.  हा कार्यक्रम नुकताच सुरू झाला असला तरी प्रेक्षकांचा या कार्यक्रमाला खूपच चांगला पाठिंबा मिळत आहे. या कार्यक्रमातील सगळेच स्पर्धक खूप चांगले डान्सर असल्याचे प्रेक्षकांचे म्हणणे आहे.

Web Title: Shashank Khetan's parents gave this reaction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :danceनृत्य