पोलिसांच्या 'त्या' प्रश्नावर रडू लागला शिजान, तुनिषाच्या अंत्यसंस्कारासाठी असणार उपस्थित?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2022 12:46 PM2022-12-27T12:46:33+5:302022-12-27T13:22:53+5:30
आतापर्यंत पोलीस कोठडीत शांत असणाऱ्या शिजान अचानक पोलिसांच्या त्या प्रश्नावर रडू लागला आहे.
टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आत्महत्या प्रकरणी नवं माहिती समोर आली आहे. या प्रकरण तिचा सहकलाकार आणि बॉयफ्रेंड शिजान खानची पोलिस चौकशी करत आहे. तुनिषाच्या एक्स बॉयफ्रेंड शिजानला २८ डिसेंबर
2022 पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्यात आलं आहे. चौकशी दरम्यान शिजानने अभिनेत्रीसोबत असलेल्या नात्याबाबत अनेक खुलासे केले आहेत. यावर आता एक नवी माहिती चौकशी दरम्यान समोर आली आहे.
चौकशीदरम्यान शिजान रडू लागला
आजतकच्या रिपोर्टनुसार वालीव पोलीस ठाण्यात शिजनची चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्याने सांगितले की, शिजान चौकशीदरम्यान रडू लागला. शिजान दोन दिवस तुनिषासोबतच्या ब्रेकअपमागच्या वेगवेगळ्या कथा सांगत होता. मात्र वालिव पोलीस ठाण्यातील महिला अधिकाऱ्याने याप्रकरणी चौकशी सुरू केली असता, शिजान खान रडू लागला. महिला अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, पूर्वी शिजान गप्प बसायचा. कालपर्यंत त्याची देहबोली पाहून काहीही अंदाज लावणे कठीण होते. पण काल रात्री तो रडायला लागला.
मंगळवारी म्हणजेच आज २७ डिसेंबरला तुनिषाच्या पार्थिवावर अंतिम संस्कार होणार आहेत. त्यामुळे शिजानला अभिनेत्रीच्या अंत्यसंस्काराला जायचे आहे का? त्याने व्यक्त केलेल्या काही इच्छा आहेत का? महिला अधिकाऱ्याने शिजनच्या बाजूने अशी कोणतीही इच्छा नाकारली आहे. ते म्हणाले की, शिजान त्याच्या बाजूने असे काहीही बोललेले नाही. चौकशीदरम्यान तो फक्त रडतो आहे. भिन्न धर्म आणि वयातील अंतरामुळे ब्रेकअप केल्याचे पोलिस कोठडीत शिजान खानने पोलिसांना सांगितले आहे.
शिजान हा तुनिषाचा एक्स-बॉयफ्रेन्ड आहे. या वर्षी जूनमध्ये ‘अली बाबा: दास्तान-ए-काबुल’ या टीव्ही शोच्या शूटिंगदरम्यान त्यांची भेट झाली होती. लडाख ट्रिपमध्ये त्यांच्यात जवळीक वाढली होती आणि ते एकमेकांना डेट करू लागले. मात्र तुनिषाच्या मृत्यूपूर्वी 15 दिवस आधी दोघांचं ब्रेकअप झालं होतं.