Tunisha Sharma Suicide : तुनिशा शर्मा आत्महत्या प्रकरणी शिझान खानला जामीन मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2023 01:24 PM2023-03-04T13:24:29+5:302023-03-04T14:32:17+5:30

अभिनेत्री तुनिषा शर्मा तिच्या आत्महत्ये प्रकरणी गेल्या तीन महिन्यांपासून तुरुंगात असलेल्या शिजान खानला जामीन मंजूर करण्यात आला आहे.

Sheezan khan got bail in tunisha sharma suicide case on 1 lakh bond after three months from jail | Tunisha Sharma Suicide : तुनिशा शर्मा आत्महत्या प्रकरणी शिझान खानला जामीन मंजूर

Tunisha Sharma Suicide : तुनिशा शर्मा आत्महत्या प्रकरणी शिझान खानला जामीन मंजूर

googlenewsNext

Tunisha Sharma Suicide Case: टीव्ही मालिका ‘अलीबाबा दास्तान-ए-काबुल’ची अभिनेत्री तुनिशा शर्मा तिच्या आत्महत्ये प्रकरणी गेल्या तीन महिन्यांपासून तिचा माजी प्रियकर आणि सहकलाकार शिजान खान अटकेत होता. आज त्याला जामीन मंजुर झाला आहे. शिझान खानला 1 लाख रुपये बाँडवर देण्यात आले. 24 डिसेंबर 2022 रोजी तुनिषा शर्माच्या मृत्यूनंतर आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली.

२० वर्षीय अभिनेत्री तुनिशा शर्माने आत्महत्या केली आणि ती शिजान खानच्या मेक रूमच्या वॉशरूममध्ये गळफास लावून घेतलेल्या अवस्थेत आढळली होती. तुनिशाच्या आईने त्याच्याविरुद्ध दाखल केलेल्या तक्रारीनंतर आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली शिजानला नंतर अटक करण्यात होती. 

शिझान खान आणि तुनिषा शर्मा 'अली बाबा'च्या लीड स्टार्स होत्या. या शोमध्ये दोघांची पहिली भेट झाली. लडाखमध्ये शूटिंगदरम्यान दोघेही प्रेमात पडले. अनेक महिने एकमेकांना डेट केल्यानंतर शिझानने डिसेंबरमध्ये तुनिशासोबत ब्रेकअप केले होते. शिझान तुनिषाची फसवणूक करत असल्याचा दावा अभिनेत्रीच्या आईने केला आहे. जेव्हा तुनिशाला हे कळले तेव्हा तिचे ब्रेकअप झाले होते.

एवढेच नाही तर तुनिशा डिप्रेशनची शिकार होती आणि तिला अनेकदा पॅनिक अटॅक आल्याचेही सांगण्यात आले.  तुनिशाला 2018 मध्येही नैराश्य आले होते. त्याच्या आईवरही मुलीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होता.
 

Web Title: Sheezan khan got bail in tunisha sharma suicide case on 1 lakh bond after three months from jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.