Video: उंटावर बसली होती शहनाज गिल, मग झालं असं काही बघून फॅन्स हसून हसून झाले लोटपोट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2023 16:14 IST2023-01-13T16:11:19+5:302023-01-13T16:14:54+5:30
Shehnaaz Gill : नुकताच शहनाजने तिच्या ऑफिशियल इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे.

Video: उंटावर बसली होती शहनाज गिल, मग झालं असं काही बघून फॅन्स हसून हसून झाले लोटपोट
Shehnaaz Gill Viral Video: शहनाज गिल सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव असते. ती कधी तिचे बोल्ड फोटोज शेअर करत असते तर कधी व्हिडीओज शेअर करत असते. असाच तिचा एक मजेदार व्हिडीओ तिने शेअर केला आहे.
नुकताच शहनाजने तिच्या ऑफिशियल इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या तुम्हाला उंटावर बसलेली दिसत आहे. पण तिला जराही अंदाज नव्हता की, तिच्यासोबत काय होणार आहे.
व्हिडीओच्या सुरूवातील शहनाज हाय स्लिट ड्रेसमध्ये फारच आत्मविश्वासनाने उंटावर बसलेली आहे. पण जशी उंटाने हालचाल केली, शहनाज घाबरली आणि ती जोरजोरात ओरडली. हा व्हिडीओ शेअर करत शहनाजने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, जान है तो जहान है, मैं डर गई थी. हा व्हिडीओ पाहून शहनाजच्या फॅन्सना त्यांची हसू आवरणं अवघड झालं आहे. एकूणच काय तर शहनाजचा हा व्हिडीओ लोकांचं मनोरंजन करत आहे.
शहनाजने हा व्हिडीओ नुकताच इन्स्टावर शेअर केला, पण काही वेळातच व्हिडीओ व्हायरल झाला. कमेंट सेक्शनमध्ये काही लोक गंमतीदार कमेंट्स करत आहेत. पण हा व्हिडीओ काही लोकांना खूप आवडला. तिचा हा अंदाज त्यांना भावला.