Bigg Boss 16 : ‘बिग बॉस 16’मधील साजिद खानचा प्रवास संपणार? मीटूप्रकरणी समन्स पाठवण्याची तयारी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2022 10:14 AM2022-10-30T10:14:34+5:302022-10-30T10:20:22+5:30
Bigg Boss 16 : साजिद खान (Sajid Khan) विरोधात तक्रार देण्यासाठी अभिनेत्री शर्लिन चोप्रा मुंबईतील जुहू पोलिस ठाण्यात पोहोचली. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना शर्लिनला अश्रू अनावर झाले....
Bigg Boss 16 : मीटू प्रकरणात अडकलेला दिग्दर्शक साजिद खान (Sajid Khan) याच्याविरोधात तक्रार देण्यासाठी अभिनेत्री शर्लिन चोप्रा (Sherlyn Chopra ) पुन्हा एकदा मुंबईतील जुहू पोलिस ठाण्यात पोहोचली होती. पण पोलिसांनी तिच्या तक्रारीची कोणतीही दखल घेतली नाही. हे पाहून शर्लिनला अश्रू अनावर झालेत. पोलिस ठाण्याबाहेरच मीडियासमोर शर्लिन ढसाढसा रडताना दिसली. जोपर्यंत सलमान खानचा वरदहस्त त्याच्या डोक्यावर आहे, तोपर्यंत साजिद खानचं कोणीही काहीही वाकडं करू शकत नाही, असं शर्लिन रडत रडत म्हणाली. साजिद खान सध्या ‘बिग बॉस 16’मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाली आहे. तो मीटूचा आरोपी आहे. 2018 मध्ये अनेक अभिनेत्री व महिलांनी त्याच्याविरोधात लैंगिक गैरवर्तनाचे आरोप केले होते. साजिदला बिग बॉसमधून हाकला, अशी मागणी शर्लिन करत आहे. पण आता साजिदचा ‘बिग बॉस 16’ मुक्काम धोक्यात आला आहे.
#SherlynChopra at juhu police station 📽️📷🕵️ @viralbhayani77pic.twitter.com/I9hIBomNd5
— Viral Bhayani (@viralbhayani77) October 29, 2022
‘बिग बॉस 16’मधून साजिदची होणार हकालपट्टी?
शर्लिन चोप्राच्या वकीलांनी सांगितले की, शर्लिनचा जबाब नोंदवण्यात आला आहे. लवकरच साजिद खानला समन्स पाठवण्यात येईल. जेणेकरून त्याचा जबाब नोंदवता येईल. यानंतर त्याच्याविरोधात कोणत्या कलमाअंतर्गत गुन्हा नोंदवायचा, हे पोलिस ठरवतील. आता साजिद ‘बिग बॉस 16’च्या घरातून लवकरच बाहेर येईल, अशी शक्यता आहे. मीटूमुळे त्याला शोमधून बाहेरचा रस्ता दाखवला जाईल. साजिद पुन्हा ‘बिग बॉस 16’च्या घरात एन्ट्री घेऊ शकले का? हेही बघूच.
My special request is to Salman Khan who's very conveniently ignoring the plight of women who've been wronged by his friend. People call you 'Bhaijaan', why can't you take a stand for us? We'll silently protest outside Salman Khan's house: Sherlyn Chopra (29.10) pic.twitter.com/i0Rtogkr5A
— ANI (@ANI) October 29, 2022
काय म्हणाली शर्लिन?
मीटूचा मोठा आरोपी साजिद खानवर आजपर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही, ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. पोलिसांनी त्याला लवकरात लवकर पोलिस ठाण्यात चौकशीसाठी बोलावले पाहिजे. घटना 2005ची आहे पण माझ्यसोबत काय घडलं, मी कोणत्या मानसिक स्थितीतून गेले, हे मी शब्दांत सांगू शकत नाही.
शर्लिनच्या आरोपानुसार, साजिद खानने तिला 2005 मध्ये एका चित्रपटात काम देण्याच्या बहाण्यानं एका ठिकाणी बोलावलं होतं. ‘साजिदने मला प्रायव्हेट पार्ट दाखवून त्याला शून्य ते दहामध्ये रेटिंग द्यायला सांगितलं होतं,’ असा तिचा आरोप आहे. साजिद खानची ‘बिग बॉस’च्या घरातून हकालपट्टी करण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या आणि दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालिवाल यांनीही अनुराग ठाकूर यांना पत्र लिहिलं होतं.