शेवंता मेकअप रूममध्ये गाणं गाते तेव्हा... एकदा पाहाच
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2020 01:52 PM2020-01-21T13:52:53+5:302020-01-21T13:54:40+5:30
‘रात्रीस खेळ चाले 2’ या मालिकेने जशी प्रेक्षकांची मनं जिंकलीत, तसेच या मालिकेतील कलाकारांनीही प्रेक्षकांच्या मनात घर केलेय.
‘रात्रीस खेळ चाले 2’ या मालिकेने जशी प्रेक्षकांची मनं जिंकलीत, तसेच या मालिकेतील कलाकारांनीही प्रेक्षकांच्या मनात घर केलेय. शेवंता आणि अण्णांच्या अदाकारीचे तर चाहते डाय हार्ट फॅन बनलेत. शेवंताची एन्ट्री झाल्यानंतर मालिकेची लोकप्रियता आणखीच वाढली. अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर शेवंताची व्यक्तिरेखा साकारत आहे. या मालिकेतून लोकप्रियता मिळाल्यानंतर अपूर्वाच्या चाहत्यांच्या संख्येतही वाढ झाली आहे.शेवंता उर्फ अपूर्वा नेमळेकर सोशल मीडियावर सक्रीय असून ती फोटो व व्हिडिओ शेअर करत असते. सध्या तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
‘इब्लिस’ या मराठी नाटकात अपूर्वा ‘जुई’ नावाचे पात्र साकारत आहे. या नाटकात वैभव मांगले मुख्य भूमिकेत असून नाटकात राहुल मेहेंदळे, सुनील देव हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. याच नाटकाच्या निमित्ताने अपूर्वाने एक व्हिडीओ सोशल मिडीया अकाउंटवर पोस्ट केला आहे. मेकअप रुममधील या व्हिडीओत अपूर्वा गाणं गाताना दिसतेय. आपल्या आवडत्या अभिनेत्रीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. चाहते या व्हिडीओवर लाईक्सचा वर्षाव करत आहेत.
7 डिसेंबर 1988 रोजी मुंबईच्या दादर येथे जन्मलेल्या अपूर्वाने किंग जॉज विद्यालयातून शालेय शिक्षण पूर्ण केले. यानंतर नॅशनल कॉलेज वांद्रे आणि रूपारेल कॉलेजात तिचे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाले.
कॉलेजमध्ये असतानाच अपूर्वाला अॅॅक्टिंगच्या ऑफर येणे सुरु झाले होते. पण अपूर्वाने या सगळ्या ऑफर धुडकावल्या होत्या. याचे कारण म्हणजे, अभिनयात तिला कुठलाही रस नव्हता. खरे तर तिला एमबीए करायचे होते. पण अपूर्वाच्या आई-वडिलांची मात्र मुलीने अभिनयात जावे अशी इच्छा होती. नियतीने त्यांची ही इच्छा पूर्ण केली. कदाचित त्यामुळेच, अभिनय क्षेत्रात काम करणे हे माझ्या नशिबातच लिहिले होते, असे अपूर्वा नेहमी म्हणते.
अपूर्वाने इव्हेंट मॅनेजरमेंट कंपनीद्वारे आपल्या करिअरची सुरुवात केली होती. त्यापूर्वीच अभिनयातही एन्ट्री केली होती. ‘आभास हा’ या मालिकेची ऑफर स्वीकारल्यानंतर एकीकडे स्वत:ची इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी आणि दुसरीकडे अभिनय अशी तिची कसरत सुरु होती. पुढे तिने स्वत:चा इमिटेशन ज्वेलरी डिझाईनिंगचा ब्रँडही काढला.