रेट्रो लुकमध्ये दिसले शितली-अज्यासह पाठकबाई-राणादा,असा होता त्यांचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2018 10:55 AM2018-01-08T10:55:00+5:302018-01-08T16:25:00+5:30

शितली - अज्या आणि पाठकबाई - राणादा यांच्यावर प्रेमाची अशी काय जादू झालीय की हे कलाकार वेगळ्याच अंदाजता प्रेमाचे ...

The Shikli-Ajya in the retro look, reader-rana, was like this | रेट्रो लुकमध्ये दिसले शितली-अज्यासह पाठकबाई-राणादा,असा होता त्यांचा अंदाज

रेट्रो लुकमध्ये दिसले शितली-अज्यासह पाठकबाई-राणादा,असा होता त्यांचा अंदाज

googlenewsNext
तली - अज्या आणि पाठकबाई - राणादा यांच्यावर प्रेमाची अशी काय जादू झालीय की हे कलाकार वेगळ्याच अंदाजता प्रेमाचे गोडवे गाताना दिसले.इतकेच नव्हेतर अगदी यावेळी त्यांचा अंदाजही चांगलाच बदल्याचे पाहायला मिळाले. काय आहे त्यांच्या आनंदाचं सीक्रेट असा प्रश्न तुम्हालाही पडला असणार.नुकतेच 'सारेगमपा-घे पंगा कर दंगा'च्या मंचावर  नृत्याचीही मेजवानी सर्वांना मिळाली आणि ही मेजवानी होती दिली होती ते आपल्या लोकप्रिय मराठी कलाकारांनी. 'सारेगामापा' 'महादंगल' कार्यक्रमात 'माझ्या नवऱ्याची बायको' फेम राधिका अर्थात अनिता दाते-केळकरने 'दिल विल प्यार व्यार' या गाण्यावर परफॉर्मन्स केला.तर राणादा-अंजली यांनीही रेट्रो लुकमध्ये परफॉर्मन्स करत प्रेक्षकांची मने जिंकली.राणादा-पाठकबाई यांच्यानंतर शितली आणि अजिंक्य यांनीही त्यांच्या नृत्याचा जलवा दाखवला. या दोघांच्या जोडीने 'बार बार देखो हजार बार देखो' या गाण्यावर परफॉर्म केले. या कलाकारांसह रसिका सुनील म्हणजेच शनायानेही जलवा दाखवला. यांसह अनेक मराठी गायकांच्या गायकीचीही सर्वच प्रेक्षकांना अनुभवायला मिळाली.यावेळी स्वप्नील बांदोडकर. जसराज जोशी, आदर्श शिंदे यांच्या गाण्यांची पर्वणी लाभली.रेट्रो या हटक्या ड्रेसथी आणि कलाकारांचे बहारदार परफॉर्मन्सने या सोहळ्याला अजुनच बहार आणली होती.

Also Read:नचिकेत लेले ठरला झी मराठी 'सारेगमप -घे पंगा करदंगा' पर्वाचा महाविजेता!

रविवारचा संपूर्ण दिवस संगीत प्रेमींसाठी आनंदाची पर्वणी ठरला. दुपारी १२ ते रात्री १० वाजेपर्यंत सुरु असलेली संगीताची मैफिल अर्थात 'सारेगमप -घे पंगा कर दंगा' पर्वाची महादंगल ७ जानेवारीला पार पडली. अंतिम फेरीत पोहोचलेल्या १२ सुरेल दंगेखोरांमधूनया पर्वाचा विजेता निवडण्यात आला. कल्याणच्या नचिकेत लेलेने आपल्या सुमधुर स्वरांनी 'सारेगमप: घे पंगा कर दंगा' पर्वाचे जेते पदपटकावले.परीक्षक बेला शेंडे, स्वानंद किरकिरे, रवी जाधव आणि सूत्रसंचालक रोहित राऊतसोबत सुरांचा हा महासोहळारंगला. १२ स्पर्धकांनी गायलेली एका पेक्षा एक गाणी,नेत्रदीपक सादरीकरण, हटके परफॉर्मन्सन या मनोरंजनाच्या यात्रेचा रसिक प्रेक्षकांनी झी मराठीवर दुपारी १२ ते रात्री १०वाजेपर्यंत लाईव्ह आनंद घेतला.  

Web Title: The Shikli-Ajya in the retro look, reader-rana, was like this

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.