Bigg Boss 15: शमिता शेट्टी साधं अन्न का खाऊ शकत नाही? झालाय हा गंभीर आजार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2021 10:46 AM2021-11-21T10:46:57+5:302021-11-21T10:49:11+5:30
Bigg Boss 15: Shamita Shetty काही दिवसांपूर्वी ‘बिग बॉस 15’मधून प्रकृती कारणास्तव बाहेर पडली होती. बिग बॉसमधून काही काळ गायब राहिलेल्या शमिताने आता शोमध्ये धमाकेदार वापसी केली आहे. पण शमिताला नेमकं काय झालं होतं? हा प्रश्न अद्यापही चाहत्यांच्या मनात आहेच.
शिल्पा शेट्टीची बहीण व अभिनेत्री शमिता शेट्टी काही दिवसांपूर्वी ‘बिग बॉस 15’मधून प्रकृती कारणास्तव बाहेर पडली होती. काही तातडीच्या वैद्यकीय चाचण्या करायच्या असल्यामुळे शमिता बिग बॉसमधून काही दिवस बाहेर पडल्याचे तिची आई सुनंदा शेट्टी हिने स्पष्ट केले होते. बिग बॉसमधून काही काळ गायब राहिलेल्या शमिताने आता शोमध्ये धमाकेदार वापसी केली आहे. पण शमिताला नेमकं काय झालं होतं? हा प्रश्न अद्यापही चाहत्यांच्या मनात आहेच. तर आता त्याचा खुलासाही झाला आहे. शमिता वर्षानुवर्षे एका गंभीर आजाराला झुंज देतेय. या आजारामुळे ती सामान्य अन्नपदार्थ खाऊ शकत नाही. केवळ ग्लूटेन फ्री ग्रॅन्युल्स ती खाते. हा काय आजार आहे तर या आजाराला कोलायटिस म्हणतात. कोलायटिस हा एक दाहक आतड्याचा आजर आहे.
या आजाराच्या रूग्णाच्या पचनमार्गात सूज येते आणि जखमा होतात. मोठ्या आतड्याला किंवा आतड्याच्या आतील अस्तराला समस्या निर्माण होऊ शकतात. कोलयटिसचा पोटामधील छोट्या आतड्यांवर देखील परिणाम दिसू लागतो. मुरड पडणे, पोटात दुखणे, थंडी वाजून ताप येणे, शौचातून रक्त जाणे, अतिसार आणि अशा ब-याच समस्या रूग्णाला सहन करावा लागतात. याच आजारामुळे शमिता ग्लूटेन फ्री डाएट घेते.
शमिता शोमध्ये परतली...
शमिता पुन्हा बिग बॉस 15 मध्ये परतली आहे. घरात एन्ट्री करताच तिने निशांत भट व राजीव अदातिया यांचा क्लास घेतला. बिग बॉस 15 चा टीआरपी कमी होतोय. टीआरपी बूस्ट करण्यासाठी मेकर्सनी बिग बॉसच्या घरात तीन नव्या वाईल्ड कार्ड एन्ट्री केल्या आहेत. रश्मी देसाई व देवोलिना भट्टाचार्जी यांची बिग बॉसच्या घरात एन्ट्री झालीये. शिवाय बिग बॉस मराठीचा वादग्रस्त स्पर्धक अभिजीत बिचुकले हाही बिग बॉसच्या घरात दाखल झाला आहे.