टीव्हीवर पहिल्यांदा शिल्पा शेट्टीच्या सासूने तिच्याबद्दल केला खुलासा!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2018 10:53 AM2018-02-11T10:53:16+5:302018-02-11T16:23:16+5:30

गेल्या काही काळापासून अभिनेत्री शिल्पा शेट्टी मोठ्या पडद्यावरून गायब आहे. परंतु छोट्या पडद्यावर ती एक रिअ‍ॅलिटी शोमध्ये जज्च्या भूमिकेत ...

Shilpa Shetty's mother-in-law revealed her for the first time on TV! | टीव्हीवर पहिल्यांदा शिल्पा शेट्टीच्या सासूने तिच्याबद्दल केला खुलासा!

टीव्हीवर पहिल्यांदा शिल्पा शेट्टीच्या सासूने तिच्याबद्दल केला खुलासा!

googlenewsNext
ल्या काही काळापासून अभिनेत्री शिल्पा शेट्टी मोठ्या पडद्यावरून गायब आहे. परंतु छोट्या पडद्यावर ती एक रिअ‍ॅलिटी शोमध्ये जज्च्या भूमिकेत बघावयास मिळत आहे. विशेष म्हणजे तिची ही भूमिका तुफान लोकप्रिय होत असून, प्रेक्षकांकडून तिचे चांगलेच कौतुकही केले जात आहे. या शोमध्ये तिच्या परीक्षणाचे तर कौतुक होतच आहे, शिवाय तिच्या सौंदर्याचीही सर्वत्र चर्चा रंगली आहे. साडीमध्ये शिल्पा कमालीची सुंदर दिसत असून, प्रेक्षक तिच्या या अंदाजावर फिदा आहेत. असो, आज आम्ही तुम्हाला शिल्पा वास्तविक जीवनात एक सून म्हणून कशी आहे, हे सांगणार आहोत. 

वास्तविक याबाबतचा खुलासा शिल्पाच्या सासूने केला आहे. त्यांच्या मते, त्यांचा मुलगा राज कुंद्रा खूपच लकी आहे, ज्याला शिल्पासारखी पत्नी मिळाली. ती माझी बेस्ट मुलगी आहे. सर्वांशीच ती प्रेमाने बोलते. मी सुरुवातीपासूनच तिचे चित्रपट बघत आली आहे. माझा सर्वात फेव्हरेट चित्रपट ‘धडकन’ आहे. कारण त्यामध्ये शिल्पा खूपच सुंदर आणि प्रेमळ दिसते. 



पुढे बोलताना शिल्पाच्या सासूने म्हटले की, ‘मला तिला फक्त एवढेच सांगायचे आहे की, तिने मला थोडेसे गोडधोड जेवण द्यावे. कारण जेव्हा मी जेवण करायला बसते, तेव्हा ती माझी प्लेट बघत असते. तसेच मी काय खायला हवे हे सातत्याने सांगत असते.’ यावर बोलताना शिल्पाने म्हटले की, मला एक नाही तर दोन आई आहेत. एक जिने मला जन्म दिला अन् दुसरी राजची आई. ती माझीही आई आहे, असे शिल्पाने म्हटले. शिल्पाची सासू ती जज् असलेल्या रिअ‍ॅलिटी शोमध्ये सहभागी झाल्या होत्या. 

Web Title: Shilpa Shetty's mother-in-law revealed her for the first time on TV!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.