Video : शिल्पा शिंदेचा अॅक्टिंगला रामराम? कॅमेरा सोडून हाती धरली ड्रिलिंग मशीन; बदलली फिल्ड
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2021 02:03 PM2021-05-30T14:03:35+5:302021-05-30T14:09:29+5:30
Shilpa Shinde : लॉकडाउनमुळे शिल्पा शिंदेची झाली अशी अवस्था ; हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही बसेल धक्का!!
‘भाभीजी घर पर है’ (Bhabiji Ghar Par Hain!) या मालिकेतील अंगुरी भाभीच्या भुमिकेमुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री शिल्पा शिंदे (Shilpa Shinde) सध्या टीव्हीपासून दूर आहे़ ही शिल्पा शिंदे सध्या तिच्या एका व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. तिचा हा व्हिडीओ पाहून चाहत्यांना धक्का बसला आहे. व्हिडीओत शिल्पा एका कंस्ट्रक्शन साईटवर दिसतेय. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर शिल्पाने ग्लॅमर इंडस्ट्री सोडली की काय? असा सवाल चाहत्यांना पडला आहे.
शिल्पाने स्वत: हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओत शिल्पा एका कंस्ट्रक्शन साईटवर दिसतेय़ कुर्ता आणि डोक्यावर कॅप घातलेल्या शिल्पाच्या हातात ड्रिलिंग मशीन आहे. हा व्हिडीओ शेअर करताना शिल्पाने दिलेले कॅप्शन वाचून चाहते काहीसे कन्फ्युज झाले आहेत.
‘लॉकडाऊन लागला आणि मी कंस्ट्रक्शन फिल्डमध्ये शिरले. ज्यांच्याकडे सध्या काम नाही, ते लोक त्यांची फिल्ड बदलू शकतात. काळासोबत सगळे काही ठीक होईल. फ़क्त सकारात्मक राहा,’ असे शिल्पाने कॅप्शनमध्ये लिहिले आहे.
शिल्पाने अॅक्टिंगला रामराम ठोकून कंस्ट्रक्शनचे काम तर सुरू केले नाही ना? असा प्रश्न चाहत्यांना सध्या पडला आहे. अनेकांनी तिच्या हिमतीची दादही दिली आहे. काहींनी तिला सुपर वुमन म्हटले आहे तर काहींनी ऑलराउंडर. कोणतेही काम लहान नसते, असे एका चाहत्याने तिच्या या व्हिडीओवर कमेंट करताना लिहिले आहे तर ही आहे खरी शिल्पा शिंदे, असे म्हणत तिचे कौतुक केले आहे.
‘भाभीजी घर पर है’ या मालिकेत शिल्पा शिंदेने साकारलेली अंगूरी भाभीची भूमिका प्रचंड लोकप्रीय झाली होती. निर्मात्यांसोबतच्या वादामुळे शिल्पाने ही मालिका मध्येच सोडली होती. या शोच्या निर्मात्यांवर शिल्पाने लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. हा शो सोडल्यानंतर शिल्पा ‘बिग बॉस’च्या 11 व्या सीझनमध्ये दिसली होती़ हा शो तिने जिंकला होता.
बिग बॉसचे 11 वे (Bigg Boss 11) सीझन जिंकल्यानंतर शिल्पा ‘पटेल की पंजाबी शादी में’ या चित्रपटात एक डान्स नंबर करून ती चर्चेत आली. अलीकडे ‘पौरषपूर’ या वेबसीरिजमध्ये झळकली. शिल्पाने करिअरमध्ये अनेक मालिका केल्यात, शो केलेत. पण यापेक्षा कुठलेही मोठे यश तिच्या पदरी पडले नाही. कामापेक्षा वेगवेगळ्या मुद्यावरच्या वक्तव्यांमुळेच ती अधिक चर्चेत राहिली.