शिल्पा शिंदेने भाभीजी घर पर है निर्माते संजय कोहली विरुद्ध केली लैंगिक अत्याचाराची तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2017 04:53 AM2017-03-25T04:53:28+5:302017-03-25T10:24:30+5:30

भाभाजी घर पर है या मालिकेतील अंगुरी भाभी या व्यक्तिरेखेमुळे शिल्पा शिंदेला खऱ्या अर्थाने ओळख मिळाली. या मालिकेतील सही ...

Shilpa Shinde's sister-in-law at home is against producer Sanjay Kohli's complaint of sexual assault | शिल्पा शिंदेने भाभीजी घर पर है निर्माते संजय कोहली विरुद्ध केली लैंगिक अत्याचाराची तक्रार

शिल्पा शिंदेने भाभीजी घर पर है निर्माते संजय कोहली विरुद्ध केली लैंगिक अत्याचाराची तक्रार

googlenewsNext
भाजी घर पर है या मालिकेतील अंगुरी भाभी या व्यक्तिरेखेमुळे शिल्पा शिंदेला खऱ्या अर्थाने ओळख मिळाली. या मालिकेतील सही पडके है हा तिचा संवाद तर चांगलाच गाजला होता. या मालिकेची निर्माती बिनेफर कोहली आणि त्यांचे पती संजय कोहली यांच्यासोबत वाद झाल्यामुळे शिल्पाने या मालिकेला रामराम ठोकला होता. या मालिकेच्या निर्मात्यांकडून मानसिक त्रास होत असल्याने ही मालिका सोडण्याचे मी ठरवले असल्याचेही ती म्हटली होती. तसेच तिने म्हटले होते की, भाभाजी घर पर है ही मालिका सोडून अन्य कुठल्याही वाहिनीवर काम करायचे ठरवल्यास तिचे करियर बरबाद केले जाईल अशी धमकीदेखील निर्मात्यांनी तिला दिली होती. तर निर्मात्यांनुसार शिल्पा मालिकेत स्वतःचे कपडे वापरते. तसेच तिने एक पर्सनल स्टायलिस्ट ठेवला आहे. हा खर्च निर्मात्यांना परवडणारा नव्हता. 
cnxoldfiles/a> या विरोधात तिने पोलिसांकडे तक्रारदेखील दाखल केली होती. पण आता या प्रकरणाला एक वेगळेच वळण मिळाले आहे. कारण या मालिकेचे निर्माते संजय कोहली यांच्या विरुद्ध शिल्पाने लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. तिने दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, गेल्या वर्षभरात मला मानसिक छळ सहन करावा लागला. मी डिप्रेशनमध्ये होते. इंडस्ट्रीतमधील अनेक महिला ही गोष्ट बोलण्यासाठी घाबरतात. पण आज त्यांची प्रतिनिधी म्हणून ही गोष्ट उघडपणे सांगत आहे. शिल्पाने एफआयआरमध्ये म्हटले आहे की, या कार्यक्रमाचे निर्माते संजय यांनी तिला अनेकवेळा सेक्सी म्हटले. तसेच त्यांनी तिला अनेकवेळा तिची इच्छा नसतानाही अलिंगन दिले. तसेच तिच्या छातीला आणि कबरेवर हात ठेवला. पिंकू पाटवा नावाच्या मेकअप मनने संजय यांना हे सगळे माझ्यासोबत करताना पाहिले होते. त्यामुळे दुसऱ्याच दिवशी पिंकीला नोकरीवरून काढण्यात आले. मी सगळ्या गोष्टींना नकार दिल्याने मला या मालिकेतून काढण्यात आले. मला ही तक्रार नोंदवण्यासाठीदेखील खूप त्रास झाला. मी माझ्या वकिलांसोबत तिनदा पोलिस स्टेशनला गेले. पण माझी तक्रार दाखल करण्यात टाळाटाळ करण्यात आली.

Web Title: Shilpa Shinde's sister-in-law at home is against producer Sanjay Kohli's complaint of sexual assault

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.