सातारी भाषा बोलणारी शीतली जर्मन भाषेत देखील तरबेज

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2018 12:40 PM2018-07-12T12:40:33+5:302018-07-12T12:44:57+5:30

अज्या आणि शीतली सोबत मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या मनात घर करून बसलं आहे.

shitali can also speak german language | सातारी भाषा बोलणारी शीतली जर्मन भाषेत देखील तरबेज

सातारी भाषा बोलणारी शीतली जर्मन भाषेत देखील तरबेज

googlenewsNext
ठळक मुद्देशिवानी हिने ११वी पासूनच जर्मन भाषेचे धडे गिरवायला सुरुवात केलीशिवानी एका आय.टी. फर्ममध्ये जर्मन लँग्वेज एक्सपर्ट म्हणून काम करत होती

झी मराठीवरी लोकप्रिय मालिका 'लागीरं झालं जी' ला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. अज्या आणि शीतली सोबत मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या मनात घर करून बसलं आहे. सगळ्यांच्या मनावर अधिराज्य करणारी शीतल म्हणजे अभिनेत्री शिवानी बावकरने या मालिकेसाठी सातारी भाषा शिकली. मालिकेत अस्खलित सातारी बोलणारी शीतली ही जर्मन भाषेतसुद्धा पारंगत आहे.

शिवानी हिने ११वी पासूनच जर्मन भाषेचे धडे गिरवायला सुरुवात केली. कॉलेज संपल्यानंतर देखील तिने आवड म्हणून जर्मन भाषेचे प्रशिक्षण चालू ठेवले. तिची आवड लवकरच तिच्या करियरमध्ये बदलली. अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी शिवानी एका आय.टी. फर्ममध्ये जर्मन लँग्वेज एक्सपर्ट म्हणून काम करत होती. जेव्हा तिला मालिका ऑफर झाली तेव्हा त्यात सातारी भाषा बोलणे अपेक्षित होते आणि जर्मन शिकल्याचा उपयोग शीतलला त्यावेळी झाला. प्रत्येक भाषा शिकायला शब्दकोशाची गरज असते आणि शिवनीकडे स्वतःची डिक्शनरी आहे.

तिचा दोन्ही भाषा शिकण्याचा अनुभव सांगताना शिवानी म्हणाली, "मी आवड म्हणून शिकलेली जर्मन माझं प्रोफेशन बनली. जेव्हा मला लगीरं झालं जी ऑफर झाली तेव्हा आमचे वर्कशॉप्स देखील घेण्यात आले. कुठलीही भाषा शिकण्यासाठी त्या भाषेत संवाद करणं खूप गरजेचं असतं. मला सेट वरती शुद्ध भाषेत बोलल्यास फाईन चार्ज केला जात असे त्यामुळे मी त्या भीतीने कमी बोलायची. पण संवाद साधण महत्वाचं असल्यामुळे मी हळू हळू सातारी देखील शिकत गेली आणि यात मला जर्मन शिकल्याचा अनुभव कामी आला. माझ्या सातारी भाषेवर सेटवरील अनेकांनी मेहनत घेतली, माझे ऑनस्क्रीन जितू काका देखील मला मार्गदर्शन करतात त्यामुळेच मी आता सातारी चांगल्याप्रकारे बोलू शकते. तसंच मी आमचे लेखक तेजपाल वाघ यांच्या गावी देखील तेथील स्थानिक महिलांसोबत काही वेळ घालवून संवाद साधला ज्याने मला सातारी शिकायला मदत झाली."

Web Title: shitali can also speak german language

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.