"तू माझा आयुष्यभराचा..." शिव ठाकरेसाठी अभिनेत्रीची खास पोस्ट, 'खतरो के...'मध्ये झाली मैत्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2023 13:58 IST2023-05-16T13:57:26+5:302023-05-16T13:58:05+5:30
शिव जिथे जातो तिथे सर्वांचं मन जिंकून घेतो. इथेही त्याने एका अभिनेत्रीचं मन जिंकलंय.

"तू माझा आयुष्यभराचा..." शिव ठाकरेसाठी अभिनेत्रीची खास पोस्ट, 'खतरो के...'मध्ये झाली मैत्री
रोहित शेट्टीच्या लोकप्रिय 'खतरो के खिलाडी' शोच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. मराठमोळा कलाकार शिव ठाकरे (Shiv Thakare) सुद्धा शोमध्ये सहभागी झाला आहे. शिव जिथे जातो तिथे सर्वांचं मन जिंकून घेतो. इथेही त्याने एका अभिनेत्रीचं मन जिंकलंय. होय त्या अभिनेत्रीने स्वत: सोशल मीडियावर शिवसोबतचे फोटो पोस्ट करत त्याची तोंडभरुन स्तुती केली आहे.
'खतरो के खिलाडी सिझन 13' चं शूट साऊथ आफ्रिकेत सुरु आहे. अनेक टीव्ही कलाकार या शोमध्ये सहभागी झाले आहेत. एकीकडे रोहित शेट्टीचं टॉर्चर आहे तर दुसरीकडे कलाकारांमध्ये मैत्री होत आहे. टीव्ही अभिनेत्री अंजुम फकीहने (Anjum Fakeeh) सोशल मीडियावर शिव ठाकरेसोबत मस्ती करतानाचे काही फोटो पोस्ट केले आहेत. तसंच या फोटोंखाली तिने शिवसाठी खास कॅप्शनही लिहिलंय. ती लिहिते,"मला सोन्याचं मन असणारा माणूस मिळालाय, ही मैत्री अशीच टिकून राहो, चुका होतील पण आपण त्या माफ करुन पुढे जाऊ, तुझ्यासारखा मित्र आयुष्यभरासाठी आहे."
अंजुमच्या या पोस्टवर शिवनेही छानशी कमेंट केली आहे. तो म्हणतो, "रडवतेस का आता वेडी, ही मुलगी ऑलराऊंडर आहे रे बाबा...जे करते ते बेस्ट करते." अंजुमने 'बडे अच्छे लगते है 2','कुंडली भाग्य','तेरे शहर मे' अशा अनेक मालिकांमध्ये भूमिका केल्या आहेत. आता अंजुम आणि शिवची ही मैत्री टीव्हीवर बघण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.