शिव ठाकरेच्या वाढदिवसाला जपली सामाजिक बांधिलकी; नेटकऱ्यांकडून होतेय कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2024 11:10 AM2024-09-09T11:10:26+5:302024-09-09T11:11:17+5:30

शिव ठाकरेच्या वाढदिवशी  सामाजिक बांधिलकी जपल्याचं पाहायला मिळालं. 

Shiv Thakare Birthday Donate blankets and food | शिव ठाकरेच्या वाढदिवसाला जपली सामाजिक बांधिलकी; नेटकऱ्यांकडून होतेय कौतुक

शिव ठाकरेच्या वाढदिवसाला जपली सामाजिक बांधिलकी; नेटकऱ्यांकडून होतेय कौतुक

Shiv Thakare Birthday : लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शोमधून नावारुपाला आलेला अमरावतीचा शिव ठाकरे नेहमी त्याच्या व्यावसायिक व वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. शिवने आपल्या खेळाडू वृत्तीने, जबरदस्त डान्सने आणि महत्त्वाचं साधेपणाने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं घर निर्माण केलं आहे. शिवचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. आज शिव ठाकरेचा ३४ वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने त्याचे चाहते त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहे. शिव ठाकरेच्या वाढदिवशी  सामाजिक बांधिलकी जपल्याचं पाहायला मिळालं. 

शिव ठाकरेच्या वाढदिवसाला निराधार आणि गरिब वृद्धांना थंडीपासून संरक्षणास मदत म्हणून ब्लँकेटचे वाटप केले आहे. तसेच अन्न दानही करण्यात आलं.  याचा एक व्हिडीओ शिव ठाकरेच्या फॅनपेजवर शेअर करण्यात आला. व्हिडीओच्याच्या कॅप्शनमध्ये लिहलं, "आशिर्वादाशिवाय सर्वात मोठी भेट काय असू शकते. आमच्या शिव ठाकरेला वाढदिवशी खास भेट". या व्हिडीओवर शिव ठाकरेने "Thanks family" अशी कमेंट केली आहे. 


शिव ठाकरे हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. तो 'बिग बॉस १६' मध्ये दिसला.  त्यानंतर सलमान खानच्या या रिॲलिटी शोने त्याला चांगलीच ओळख मिळवून दिली. यासोबतच तो रोहित शेट्टीच्या 'खतरों के खिलाडी सीझन १३'मध्ये झळकला. आपला साधेपणा, मनमिळाऊ स्वभावामुळे अभिनेत्याने चाहत्यांची मनं जिंकली आहेत. तसेच शिव ठाकरेने त्याचं नृत्यकौशल्य तसेच दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांना आपलंस केलं. 


शिव अत्यंत सामान्य कुटुंबातून आलेला आहे.  इतकी प्रसिद्धी मिळाल्यानंतरही त्याचे पाय जमिनीवर आहेत.  त्याच्या स्वभावातील याच साधेपणामुळे आणि चाहत्यांशी प्रेमाने वागण्याच्या सवयीमुळे तो दिवसेंदिवस लोकप्रिय ठरत आहे. 
 

Web Title: Shiv Thakare Birthday Donate blankets and food

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.