'झलक दिखला जा 11'मधून शिव ठाकरे बाहेर; चाहत्यांमध्ये नाराजीचा सूर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2024 10:04 AM2024-02-26T10:04:16+5:302024-02-26T10:04:45+5:30

Shiv thakre: झलक दिखला जा 11 च्या ग्रँड फिनालेची तयारी सुरु असतानाच ऐन वेळी शिव या शोमधून बाहेर पडला आहे.

shiv-thakare-eliminated-from-jhalak-dikhhla-jaa-11-top-five-finalists-see-reaction | 'झलक दिखला जा 11'मधून शिव ठाकरे बाहेर; चाहत्यांमध्ये नाराजीचा सूर

'झलक दिखला जा 11'मधून शिव ठाकरे बाहेर; चाहत्यांमध्ये नाराजीचा सूर

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता शिव ठाकरे (Shiv Thakare) याने बिग बॉस मराठीचं पर्व गाजवल्यानंतर थेट हिंदी कलाविश्वात एन्ट्री घेतली आहे. हिंदी बिग बॉस, खतरों के खिलाडी आणि आता झलक दिखला जा अशा कितीतरी रिअॅलिटी शोज मध्ये तो दिसून येत आहे. मात्र, झलक दिखला जाच्या ११ व्या पर्वात शिवने अंतिम फेरीपर्यंत मजल मारली. परंतु, या शोच्या ग्रँड फिनालेपूर्वीच त्याला बाहेर पडावं लागलं. ज्यामुळे चाहत्यांमध्ये नाराजीचं वातावरण पसरलं आहे.

सध्या छोट्या पडद्यावर झलक दिखला जा या डान्स रिअॅलिटी शोच्या ग्रँड फिनालेची तयारी सुरु आहे. यामध्ये अंतिम टप्प्यात हा कार्यक्रम पोहोचला असताना शोने टॉप 5 स्पर्धकांची नाव घोषित केली. मात्र, यात शिवचं नाव नसल्यामुळे प्रेक्षकांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे.

शिव ग्रँड फिनालेमध्ये न पोहोचल्यामुळे अनेकांनी या कार्यक्रमाला ट्रोल केलं आहे. दरवेळी मराठी माणसांसोबतच या इंडस्ट्रीत असं का होतं? असा प्रश्नही काही नेटकऱ्यांनी विचारला आहे. मात्र, शोमधून बाहेर पडल्यावर शिवने त्याची प्रतिक्रिया दिली. या कार्यक्रमाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात शिवने त्याची प्रतिक्रिया दिली आहे.

 "झलक दिखला जा या कार्यक्रमात येणं हे माझं स्वप्न होतं. मी खूप आनंदात आहे. मी या कार्यक्रमातून खूप गोष्टी शिकलो",असं म्हणत शिवने त्याची प्रतिक्रिया दिली.

दरम्यान, झलक दिखला जा 11 च्या टॉप 5 फायनलिस्टमध्ये मनीषा रानी, धनश्री वर्मा, शोएब इब्राहिम, अद्रिजा सिन्हा आणि श्रीराम चंद्र या कलाकारांची वर्णी लागली आहे. तर, शिव ठाकरेला मात्र ऐनवेळी या शो मधून बाहेर पडावं लागलं आहे. कार्यक्रमाचा ग्रँड फिनाले 3 मार्च 2024 रोजी रंगणार आहे. 

Web Title: shiv-thakare-eliminated-from-jhalak-dikhhla-jaa-11-top-five-finalists-see-reaction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.