साऊथ आफ्रिकेत पोहोचला शिव ठाकरे; स्टायलिश फोटोशूट चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2023 18:03 IST2023-05-22T18:02:46+5:302023-05-22T18:03:48+5:30
Shiv thakare: शिव सध्या साऊथ आफ्रिकेत असून येथील काही फोटो त्याने शेअर केले आहेत.

साऊथ आफ्रिकेत पोहोचला शिव ठाकरे; स्टायलिश फोटोशूट चर्चेत
आपल्या मराठमोळ्या अंदाजासाठी खासकरुन ओळखला जाणारा लोकप्रिय अभिनेता म्हणजे शिव ठाकरे (shiv thakare) . बिग बॉस मराठी आणि हिंदी (bigg boss) गाजवल्यानंतर शिवने त्याचा मोर्चा खतरों के खिलाडी या शोकडे वळवला आहे. त्यामुळे सध्या तो चर्चेत येत आहे. बऱ्याचदा प्रोफेशनल आणि पर्सनल लाइफमुळे चर्चेत येणारा शिव यावेळी त्याच्या भटकंतीमुळे चर्चेत येत आहे. शिव सध्या साऊथ आफ्रिकेत असून येथील काही फोटो त्याने शेअर केले आहेत.
शिव सध्या खतरों के खिलाडीचं (khatron ke khiladi 13) दक्षिण आफ्रिकेत शुटिंग करत आहे. त्यामुळे या शोच्या निमित्ताने तो इथे पोहोचला असून निवांत वेळात त्याने फोटोशूट केलं आहे. या फोटोशूटची सध्या नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगली आहे.
दरम्यान, शिवने सूर्यास्ताच्या वेळी एका झाडाजवळ हे फोटोशूट केलं आहे. यात त्याने हटके पोझही दिल्या आहेत. गेल्या काही काळापासून शिव सातत्याने चर्चेत येत आहे. बिग बॉस, खतरों के खिलाडीपूर्वी त्याने रोडिजमध्येही सहभाग घेतला होता. त्यामुळे शिव मराठीसह हिंदी कलाविश्वातही लोकप्रिय आहे.