हिंदी कलाकारांवर शिव ठाकरे पडतोय भारी; 'खतरों के खिलाडी'साठी घेणार सर्वाधिक मानधन?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2023 14:18 IST2023-04-23T14:17:02+5:302023-04-23T14:18:33+5:30
Shiv thakare: शिवला या नव्या शोची ऑफर मिळाली असून तो आगामी पर्वात झळकणार असल्याचं म्हटलं जात आहे.

हिंदी कलाकारांवर शिव ठाकरे पडतोय भारी; 'खतरों के खिलाडी'साठी घेणार सर्वाधिक मानधन?
बिग बॉस मराठी (Bigg boss marathi) आणि बिग बॉस १६ या रिअॅलिटी शोच्या माध्यमातून तुफान लोकप्रिय झालेला मराठमोळा अभिनेता म्हणजे शिव ठाकरे (shiv thakare). आपल्या स्वभावातील साधेपणा आणि मिनमिळावू वृत्तीमुळे शिव अल्पावधीत लोकप्रिय झाला. विशेष म्हणजे बिग बॉसमध्ये झळकल्यापासून त्याच्यामागे अनेक रिअॅलिटी शोच्या रांगा लागल्या आहेत. यामध्येच आता तो रोहित शेट्टीच्या गाजलेल्या 'खतरों के खिलाडी' या शोमध्ये झळकण्याची शक्यता आहे. शिवला या नव्या शोची ऑफर मिळाली असून तो आगामी पर्वात झळकणार असल्याचं म्हटलं जात आहे. विशेष म्हणजे या शो साठी त्याने सर्वात जास्त मानधन आकारल्याचं सांगण्यात येत आहे.
अलिकडेच शिव ठाकरेने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने खतरों के खिलाडीची हिंट दिल्याचं पाहायला मिळालं. मला आगीची भीती वाटत नाही मात्र पाण्याची वाटते, मला पोहता येत नाही त्यामुळे भीती वाटते. परंतु, मी पोहण्याचा सराव करत आहे, असं शिवने सांगितलं.
खतरों के खिलाडीच्या आगामी पर्वासाठी शिव सर्वाधिक मानधन घेणार असल्याचं म्हटलं जात आहे. शिव एका एपिसोडसाठी तब्बल ५ ते ६ लाख रुपये मानधन घेणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे दर आठवड्याला त्याला १० ते १२ लाख रुपये मिळणार आहेत.
दरम्यान, खतरों के खिलाडीच्या आगामी पर्वामध्ये शिव ठाकरे सहभागी होणार असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे शिवला या कार्यक्रमात पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत.