अमरावतीचा वाघ डेझी शाहच्या प्रेमात? अफेअरच्या चर्चांवर शिव ठाकरेने सोडलं मौन
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2024 16:04 IST2024-03-26T16:03:43+5:302024-03-26T16:04:45+5:30
शिव ठाकरेने नुकतीच हर्ष लिंबाचिया आणि भारती सिंहच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली.

अमरावतीचा वाघ डेझी शाहच्या प्रेमात? अफेअरच्या चर्चांवर शिव ठाकरेने सोडलं मौन
अमरावतीचा वाघ शिव ठाकरे(Shiv Thakre) मराठी बिग बॉसचा विजेता ठरला आणि लोकप्रिय झाला. कितीही यश मिळवलं तरी त्याचे पाय जमिनीवरच आहेत हे त्याच्या कृतीतून नेहमी दिसून येतं. बिग बॉसनंतर त्याने हिंदी बिग बॉसमध्येही सहभाग घेतला. यामध्ये तो रनर अप ठरला. सलमान खानही त्याच्यावर प्रभावित झाला होता. तर शिव ठाकरे आणि वीणा जगताप यांच्या ब्रेकअपनंतर त्याचं नाव डान्सर डेझी शाहसोबत (Daisy Shah) जोडलं गेलं होतं. दोघंही खुलेआम सोबतही दिसत होते. या डेटिंग रुमरवर शिवनेच आता मौन सोडलं आहे.
शिव ठाकरेने नुकतीच हर्ष लिंबाचिया आणि भारती सिंहच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली. यावेळी त्याने प्रोफेशनल आणि वैयक्तिक अशा सर्वच विषयांवर चर्चा केली. गेल्या काही दिवसांपासून तो डेझी शाहसोबत दिसत असल्याने यावर त्याला प्रश्न विचारण्यात आला. तर शिव म्हणाला, "नाही, काहीच नाहीए. तुम्ही एकदा जरी सोबत कॅफेमध्ये गेलात, तुम्हाला बघितलं गेलं आणि दोघंही हसलात. बास! लोक म्हणतात, कितनी प्यारी जोडी है! पण असं काहीच नव्हतं. ती माझी खूप छान मैत्रीण आहे आणि कायम राहील, बाकी काहीच नाही."
शिव ठाकरे 'खतरो के खिलाडी सिझन 13' मध्ये सहभागी झाला होता. यामध्ये अनेक टीव्ही कलाकारही होते. याच सेटवर त्याची आणि डेझीची ओळख झाली. त्यांना अनेकदा सोबत बघितलं गेलं. पण दोघांनी नेहमीच या फक्त अफवा असल्याचं स्पष्ट केलं आहे.