'शिवा' फेम अभिनेत्री पूर्वा कौशिक म्हणते,"मी लवंगी फटाक्यासारखी आहे"

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2024 03:45 PM2024-11-02T15:45:08+5:302024-11-02T15:46:01+5:30

Purva Kaushik : आपल्या धमाकेदार व्यक्तिरेखेने सर्वांचं मन जिंकणारी 'शिवा' म्हणजेच पूर्वा कौशिकने दिवाळीच्या आठवणीचा एक किस्सा सांगितला आहे.

'Shiva' fame actress Purva Kaushik says, "I am like a clove firecracker". | 'शिवा' फेम अभिनेत्री पूर्वा कौशिक म्हणते,"मी लवंगी फटाक्यासारखी आहे"

'शिवा' फेम अभिनेत्री पूर्वा कौशिक म्हणते,"मी लवंगी फटाक्यासारखी आहे"

'शिवा' मालिका (Shiva Serial) सुरूवातीपासूनच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. मालिकेत रोज काही ना काही घडामोडी घडताना दिसत आहे. आशू आणि शिवाची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते. दरम्यान आपल्या धमाकेदार व्यक्तिरेखेने सर्वांचं मन जिंकणारी 'शिवा' म्हणजेच पूर्वा कौशिकने दिवाळीच्या आठवणीचा एक किस्सा सांगितला आहे.

पूर्वा कौशिक म्हणाली की, "पहिलं तर सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा. मला लक्षात आहे की मी लहान होते आणि मला खुपसारे फटाके पाहिजे होते. म्हणजे मुलींना कसं कपाट, कपड्याने भरलेलं बघायला आवडतं तसच मला तेव्हा खूप फटाके हवे होते म्हणजे जर ५ दिवस दिवाळी आहे तर १० दिवस वापरता येतील इतके फटाके मला हवे होते. त्यासाठी मी बाबांकडे इतका हट्ट केला. मी तेव्हा ७ वीत होते. दिवाळीची सुट्टी पडायच्या आधी शेवटचा दिवस होता शाळेत आणि अचानक मला माहिती नाही काय सुचलं की आपण फटाक्यांसाठी अती हट्ट बाबांजवळ केला आणि बाबांनी ही मला समजावलं की इतके फटाके नाही फोडायचे. लोकांना आणि प्राण्यांना त्रास होतो आणि त्यानंतर मी कधीच फटाके वाजवले नाहीत. ही आठवण माझ्या स्मरणात आहे. 

''मी लवंगी फटाक्यासारखी''

मला वाटत मी लवंगी फटाक्यासारखी आहे. कारण मी छोट्या-छोट्या कारणांवरून फुटते. माझी जर फराळाशी तुलना करायची असेल तर मला चिवडा आवडतो आणि जसे चिवड्यात शेंगदाणे, खोबरं, पोहे, शेव या सर्वगोष्टी एकमिश्र असतात मी ही तशीच आहे. मी सर्वाना सांभाळून घेते असं मला वाटते, असे पूर्वा म्हणाली.

Web Title: 'Shiva' fame actress Purva Kaushik says, "I am like a clove firecracker".

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.