लग्नाच्या चर्चांवर शिवांगी जोशीने सोडलं मौन; पोस्ट शेअर करत म्हणाली, 'I love...'
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2024 16:20 IST2024-05-03T16:19:20+5:302024-05-03T16:20:04+5:30
शिवांगी जोशी आणि कुशल टंडन यांनी 'बरसाते मौसम प्यार का' मालिकेत एकत्र काम केलं होतं.

लग्नाच्या चर्चांवर शिवांगी जोशीने सोडलं मौन; पोस्ट शेअर करत म्हणाली, 'I love...'
'ये रिश्ता क्या कहलाता' फेम अभिनेत्री शिवांगी जोशीच्या (Shivangi Joshi) लग्नाच्या चर्चांना उधाण आलंय. शिवांगी कोस्टार कुशल टंडनला डेट करत असल्याच्या चर्चा अनेक दिवसांपासून सुरु होत्या. तर आता तिचा साखरपुडा असल्याचीही अफवा पसरली. अखेर यावर आता शिवांगीने स्वत:च स्पष्टीकरण दिलंय. या सर्व चर्चा खऱ्या आहेत की खोट्या हे तिने सांगितलं आहे.
शिवांगी जोशी आणि कुशल टंडन यांनी 'बरसाते मौसम प्यार का' मालिकेत एकत्र काम केलं होतं. वर्षभराच्या आतच ही मालिका बंद पडली. मात्र या दरम्यान दोघांमध्ये जवळीक वाढली. शिवांगी आणि कुशल प्रेमात असल्याच्या चर्चांना उधाण आलं. तर आता त्यांच्या साखरपुड्याचीही अफवा पसरु लागली. मात्र शिवांगीने या चर्चांना पूर्णविराम दिलाय. तिने इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत लिहिले, "मला अफवा आवडतात. यामुळे नेहमी मलाच स्वत:बद्दल माहित नसलेल्या अनेक भन्नाट गोष्टी कळतात."
दुसरीकडे कुशल टंडननेही या चर्चा खोट्या असल्याचं स्पष्ट केलं. कुशल सध्या थायलंडमध्ये मार्शल आर्ट्सचं ट्रेनिंग घेत आहे. कुशल टंडन हा गौहर खानचा एक्स बॉयफ्रेंड आहे. बिग बॉसमध्ये असताना दोघांमध्ये अफेअर सुरु झालं होतं. मात्र त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही. तर शिवांगीही बराच काळ 'ये रिश्ता क्या कहलाता है' मधील कोस्टार मोहसिन खानला डेट करत होती. मात्र त्यांचं ब्रेकअप झालं.