अफेअरच्या चर्चांदरम्यान शिवांगी जोशीचा व्हिडिओ व्हायरल, बॉयफ्रेंड कुशलसोबत केली धमाल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2024 05:34 PM2024-06-11T17:34:28+5:302024-06-11T17:35:28+5:30

शिवांगी कुशलपेक्षा १३ वर्षांनी लहान आहे. 

Shivangi Joshi s video goes viral amid talk of affair with boyfriend Kushal Tandon | अफेअरच्या चर्चांदरम्यान शिवांगी जोशीचा व्हिडिओ व्हायरल, बॉयफ्रेंड कुशलसोबत केली धमाल

अफेअरच्या चर्चांदरम्यान शिवांगी जोशीचा व्हिडिओ व्हायरल, बॉयफ्रेंड कुशलसोबत केली धमाल

टीव्ही अभिनेत्री शिवांगी जोशीने (Shivangi Joshi) काही दिवसांपूर्वीच वाढदिवस साजरा केला. 'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेमुळे तिला प्रसिद्धी मिळाली. शिवांगी सध्या अभिनेता कुशल टंडनला (Kushal Tandon) डेट करत असल्याची चर्चा आहे. दोघांनी 'बरसाते मौसम प्यार का' मालिकेत एकत्र काम केलं होतं. तेव्हापासून त्यांच्या अफेअरची चर्चा सुरु झाली. आता नुकताच शिवांगीचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यामध्ये ती एकदम खिदळताना दिसत आहे. 

कुशल टंडन सध्या थायलंडमध्ये मार्शल आर्ट्सचं प्रशिक्षण घेत आहे. शिवांगीही नुकतीच थायलंडला बॉयफ्रेंडला भेटायला जाऊन आली. त्यांचा बॉक्सिंग मॅच पाहतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. कुशल टंडनने शिवांगीला किस केल्याचंही व्हायरल झालं. आता शिवांगीचा अक्षरश: खिदळतानाचा व्हिडिओ व्हायरल होतोय. यात ती प्रचंड हसत आहे, नाचत आहे, पळत आहे. तिने गुलाबी रंगाचा टॉप आणि डेनिम जीन्स घातली आहे. यात ती खूपच क्युट दिसत आहे. कुशल टंडननेच हा व्हिडिओ घेतल्याचं दिसत आहे. त्याचा आवाजही मागून ऐकू येत आहे. या व्हिडिओतून ते एकमेकांसोबत किती आनंदी आहेत हे दिसून येतंय.

कुशल टंडन हा गौहर खानचा एक्स बॉयफ्रेंड आहे. बिग बॉसमध्ये असताना दोघांमध्ये अफेअर सुरु झालं होतं.  मात्र त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही. तर शिवांगीही बराच काळ 'ये रिश्ता क्या कहलाता है' मधील कोस्टार मोहसिन खानला डेट करत होती. मात्र त्यांचं ब्रेकअप झालं. शिवांगी कुशलपेक्षा १३ वर्षांनी लहान आहे. 

Web Title: Shivangi Joshi s video goes viral amid talk of affair with boyfriend Kushal Tandon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.