शिवानी बावकरला हवी चाहत्यांची साथ, १६ कोटींचं इजेक्शनसाठी हवेत मदतीचे हाथ
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2021 04:01 PM2021-05-21T16:01:58+5:302021-05-21T16:02:42+5:30
नुकतेच शिवानी बावकरने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून मदतीसाठी आवाहन करताना दिसत आहे.
अभिनेत्री शिवानी बावकर सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. सोशल मीडियावर वेगवगेळ्या गोष्टी शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असते. स्पायनल मस्क्यूलर ऍट्रोपी’ नावाच्या दुर्मिळ आजाराने पीडित मुलाला मदत करण्यासाठी आता शिवानी बावकर पुढे आली आहे.
मुलाच्या उपचारासाठी सध्या 16 कोटी रुपयांची गरज आहे. शिवानीने लोकांना मुलाच्या उपचारात मदत करण्याचे आवाहन केले आहे.नुकतेच सोशल मीडियावर तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून मदतीसाठी आवाहन करताना दिसत आहे.
हा व्हिडीओ पोस्ट करत तिने सांगितले की, युवान हा रुपाली आणि अमित रामटेककर यांचा मुलगा आहे. अवघ्या १५ महिन्यांचे हे बाळ आहे. त्याला ‘स्पायनल मस्क्युलर ऍट्रोपी’ हा दुर्मिळ आजार आहे.जगातील सर्वात महागड्या औषधाची त्याला आवश्यकता आहे. त्याच्या उपचारासाठी सुमारे 16 कोटी रुपयांची गरज आहे. आपण देणगी त्यांना मदत करू शकता.या आजरावर केवळ हाच उपाय आहे. १६ कोटीचं इंजेक्शन ३० दिवसात देणं खुप गरजेचं आहे.
मी सर्व रसिक मायबाप प्रेक्षकांना आवाहन करते कि, चला एकत्र येऊन बाळ युवानला जीवदान देऊयात. आपल्या कडून शक्य होईल तितकी आर्थिक मदत करूयात.यासाठी ती खास बाळाच्या आई- वडिलांसह लाईव्ह येणार आहे. आपण केलेली मदत या बाळासाठी जीवनदान ठरु शकते त्यामुळे जमेल तेवढी मदत करण्यास आवाहन शिवानीने तिच्या या व्हिडीओच्या माध्यमातून केले आहे. शिवानीचा हा व्हिडीओ पाहून चाहत्यांनीही मदत करण्याचे वचनही देत आहेत.
आज प्रत्येकाला प्रत्येकाच्या मदतीची गरज आहे. त्यामुळे आपण मदतीचा हात पुढे करायला हवा. एकत्र येत आपण ब-याच लोकांचे आयुष्य बदलू शकतो याच उद्देशाने शिवानीने मदतीचे आवाहन करण्यासाठी पाऊल उचलंलं आहे.