'लागिरं झालं जी'मधील शीतली आठवतंय का?, आता दिसतेय इतकी ग्लॅमरस
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2021 18:23 IST2021-03-11T18:11:49+5:302021-03-11T18:23:27+5:30
'लागीर झालं जी' मालिकेत शिवानी बावकर हिने मोठ्या खुबीने शीतली ही भूमिका साकारली होती.

'लागिरं झालं जी'मधील शीतली आठवतंय का?, आता दिसतेय इतकी ग्लॅमरस
'लागीर झालं जी' मालिकेत शिवानी बावकर हिने मोठ्या खुबीने शीतली ही भूमिका साकारली होती. आज शिवानी आपला वाढदिवस साजरा करते आहे. या मालिकेत देसी अंदाज तिचा पाहायला मिळाला होता. मात्र आता सोशल मीडियाच्या माध्यमातून तिचे नवीन नवीन लूक समोर येत आहे. या फोटोंमध्ये ती दिवसेंदिवस अधिक बोल्ड आणि ग्लॅमरस होत असल्याचे पाहायला मिळत आहे. तिच्या ऑनस्क्रीन लूक प्रमाणेच ऑफस्क्रीन लूकलाही तितकीच पसंती मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावरही बरीच एक्टिव्ह असते.
आपले फोटो आणि व्हिडिओ ती आपल्या फॅन्ससह शेअर करत असते. या माध्यमातून ती आपल्या फॅन्सशी संवाद साधत असते. नुकताच शिवानीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोत शिवानीचा ग्लॅमरस आणि तितकाच माडर्न अंदाज पाहायला मिळत आहे. ब्लॅक अँड व्हाईट फोटोतील तिचा अंदाज कुणालाही घायाळ करेल असाच आहे. शिवानीच्या या फोटोला तिच्या फॅन्सकडून बरेच लाइक्स मिळत आहे. तसंच या फोटोवर तिचे मित्र-मैत्रिणी आणि फॅन्स कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
अभिनय क्षेत्रात येण्याआधी शिवानीने जर्मन ट्रान्सलेटर म्हणूनही एका आयटी कंपनीत काम केले आहे. कॉलेजमध्ये असताना जर्मन भाषा ऑप्शनल म्हणून निवडली होती. ती शिकत असताना शिवानीने ती चटकन आत्मसात केली. शिकताना जर्मन भाषेबाबत आवड निर्माण झाली. त्यामुळे जर्मन भाषा शिकण्याच्या विविध लेव्हल्स तिने पार केल्या. त्यामुळेच मराठी, हिंदी, इंग्रजीप्रमाणेच शिवानी जर्मन भाषाही तितक्याच फाडफाड आणि बिनधास्तपणे बोलू शकते.