'गाथा नवनाथांची' मालिकेत सुरू होणार शिवपुराण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2024 04:58 PM2024-10-28T16:58:39+5:302024-10-28T16:58:49+5:30

Gatha Navnathachi Serial : नवनाथांची कथा उलगडून दाखविणारी 'गाथा नवनाथांची' ही पौराणिक मालिका आजपर्यंत प्रेक्षकांचे मनोरंजन करत आली आहे. यामध्ये आत्तापर्यंत नाथांचे अवतार, त्यांचे प्रवास आणि लीला हे सर्व दाखवण्यात आलं आहे.

Shivpuran will start in 'Gatha Navnathachi' serial | 'गाथा नवनाथांची' मालिकेत सुरू होणार शिवपुराण

'गाथा नवनाथांची' मालिकेत सुरू होणार शिवपुराण

सोनी मराठी वाहिनीवरील नवनाथांची कथा उलगडून दाखविणारी 'गाथा नवनाथांची' (Gatha Navnathachi Serial) ही पौराणिक मालिका आजपर्यंत प्रेक्षकांचे मनोरंजन करत आली आहे. यामध्ये आत्तापर्यंत नाथांचे अवतार, त्यांचे प्रवास आणि लीला हे सर्व दाखवण्यात आलं आहे. सोबतच नाथांची शिकवण, जडणघडण, महादेवांची शिकवण आणि दत्तगुरूंचे अध्यायही प्रेक्षकांना पाहायला मिळाले. महादेवांची शिकवण, त्यांचे अनोखे अध्याय यांच्यामुळे नवनाथांना शिकवण मिळाली. 

महादेव हे नाथांच्या प्रवासातील सगळ्यांत महत्त्वाचे गुरू. महादेवांनी नाथांना वारंवार  मदत केली आहे. नाथांनी दिलेली आजवरची शिकवण आपण पहिली. गाथा नवनाथांची मालिकेत आता महापर्व सुरू होते आहे. या महापर्वात निरनिराळ्या गोष्टी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. त्यातच आता मालिकेत शिवपुराणाची सुरुवात  होणार आहे. यात नाथांच्या मुखातून महादेवांचे आजवरचे चमत्कार अनुभवायला मिळणार आहेत. इतकंच नाही तर महादेव आपल्याला मनुष्यरूपातही  पाहायला मिळणार आहेत. आता मनुष्यरूपात येऊन नाथांसोबत त्यांच्या समस्यांचं निराकरण करण्यास मदत करतील. 

लेखक आणि निर्माते संतोष अयाचित म्हणाले....

मालिकेत शिवपुराण सुरु करण्याबाबत मालिकेचे लेखक आणि निर्माते संतोष अयाचित म्हणाले की, "नवनाथ किंवा नाथ संप्रदाय जो मुळात निर्माण झाला तो श्री दत्तगुरु आणि श्री महादेव यांच्या प्रेरणेतून अशी मान्यता आहे. मंत्रशक्ती हे नाथांचे बलस्थान आहे संपूर्ण भारत भूमीत भ्रमण करत त्यांनी लोककल्याणाचे कार्य केलं. त्यांनी लिहलेलं साहीत्य आजही उपलब्ध आहे. हे नाथ शिवाशी जोडले आहेत अनेक साम्यस्थळे दोघांमध्ये दिसतात. एका श्लोकात महादेव पार्वती देवींना सांगतात कि गोरक्ष हे माझेच प्रतिरूप आहे. अशा शिवाचे पूर्ण हे नाथांचे अविभाज्य असे अंग आहेत." 

महादेवांच्या भूमिकेत अभिनेता संकेत खेडकर

गाथा नवनाथांची मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडते आहे. आता  शिवपुराण विशिष्ट पद्धतीने दाखविले जाणार आहे. महादेवांच्या भूमिकेत अभिनेता संकेत खेडकर पाहायला मिळणार आहे. महादेवांची भूमिका तो चोख बजावताना पाहायला मिळेल. महादेवांची निरनिराळी रूपे साकारताना तो दिसणार आहे आणि आपल्या भूमिकेला न्यायदेखील देणार आहे. शिवपुराण साकारताना महादेवाची विविध रूपे प्रेक्षकांना पाहायला मिळतील. नाथांच्या मुखातून हे शिवपुराण आपल्याला ऐकायला आणि पाहायला मिळेल. 
 

Web Title: Shivpuran will start in 'Gatha Navnathachi' serial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.