रणबीर कपूरची जबरा फॅन आहे ही टीव्ही अभिनेत्री, एक झलक पाहण्यासाठी केले होते 'हे' काम

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2019 09:00 PM2019-01-31T21:00:00+5:302019-01-31T21:00:00+5:30

शिव्याने विविध मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. 'एक रिश्ता साझेदारी का' या मालिकेतही तिने काम केले आहे. या मालिकेत किंशुक वैद्यसह तिने काम केले आहे.

shivya pathania Big Fan Of Ranbir Kapoor | रणबीर कपूरची जबरा फॅन आहे ही टीव्ही अभिनेत्री, एक झलक पाहण्यासाठी केले होते 'हे' काम

रणबीर कपूरची जबरा फॅन आहे ही टीव्ही अभिनेत्री, एक झलक पाहण्यासाठी केले होते 'हे' काम

googlenewsNext

सर्वसामान्यांना सेलिब्रिटींबद्दल असलेले आकर्षण आणि क्रेझ आपण समजू शकतो. मात्र एका कलाकारावर दुस-या कलाकाराची जादू झाली आहे आणि त्याची एक झलक पाहण्यासाठी त्याने तासनतास घालवलेत असं तुम्ही कधीच ऐकलं नसेल. मात्र अशी एक घटना नुकतीच समोर आली आहे. हिंदी चित्रपटसृष्टीचा बर्फी म्हणजेच अभिनेता रणबीर कपूरचे प्रचंड फॅन फॉलोइंग आहे.  सर्वसामान्याप्रमाणे काही कलाकारामंडळींनाही  रणबीरची प्रचंड क्रेझ आहे.  त्यामुळे त्याची एक झलक पाहण्यासाठी अनेकजण काही ही करायला तयार होतात. असेच काहीसे घडले होते टीव्ही अभिनेत्री शिव्या पठानियासोबत.  छोट्या पडद्यावरील मालिका दिल ढूँढता है या मालिकेतील प्रमुख अभिनेत्री शिव्या पठानिया सुरुवातीपासूनच रणबीरची फॅन आहे. 

अभिनेता रणबीर कपूरची डायहार्ट फॅन असल्याने त्याची एक झलक पाहता यावी यासाठी त्याच्या घराबाहेर तासनतास प्रतीक्षा केली होती अशी कबुली तिने  एका मुलाखती दरम्यान दिली होती. मात्र तासनतास थांबूनही रणबीरचं दर्शन न झाल्याने कमनशिबी ठरल्याची खंतही तिने बोलून दाखवली. इतका वेळ वाट पाहूनही रणबीरला पाहता आलं नसल्याने त्यावेळी प्रचंड निराश झाल्याचं तिने सांगितले.

शिव्याने विविध मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. 'एक रिश्ता साझेदारी का' या मालिकेतही तिने काम केले आहे. या मालिकेत किंशुक वैद्यसह तिने काम केले आहे. किंशुकसोबतच्या ऑफस्क्रीन रोमान्समुळे शिव्या चर्चेत राहिली होती.तुर्तास
सामान्य रसिकांसह टीव्हीच्या दुनियेतील कलाकारसुद्धा रणबीरचे डायहार्ट फॅन असल्याचे पाहायला मिळते.  

Web Title: shivya pathania Big Fan Of Ranbir Kapoor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.