तुनिषा शर्मा प्रकरणात मोलकरणीचा धक्कादायक खुलासा, म्हणाली - 'तुनिषाची आईही शिजानच्या...'
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2022 12:27 PM2022-12-30T12:27:35+5:302022-12-30T12:27:52+5:30
Tunisha Sharma Case : तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होताना दिसत आहे. दरम्यान अभिनेत्रीच्या घरातील मोलकरीण आणि आई वनिता शर्मा यांच्या दाव्यामुळे तुनिषा शर्मा मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे.
तुनिषा शर्मा (Tunisha Sharma ) आत्महत्या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होताना दिसत आहे. दरम्यान अभिनेत्रीच्या घरातील मोलकरीण आणि आई वनिता शर्मा यांच्या दाव्यामुळे तुनिषा शर्मा मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. पोलिसांनी शिजानच्या सीक्रेट गर्लफ्रेंडची चौकशी केली आहे, तर तुनिषाच्या आईने आरोप केला आहे की शिजान खान ड्रग्ज घेतो.
पोलिसांच्या चौकशीत अभिनेत्रीच्या घरी काम करणाऱ्या मोलकरणीने मोठे खुलासे केले आहेत. या दोघांच्या लग्नाची तयारी सुरू असल्याचे घरातील मोलकरणीने सांगितले आहे. एवढेच नाही तर तुनिषा आणि शिजान एकमेकांच्या घरी जात असत. दोघेही ४-६ दिवस एकमेकांच्या घरी राहायचे. तुनिषाची आई वनिताही शिजान खानच्या घरी जात होती. मात्र ब्रेकअपनंतर तुनिषा खूप दुःखी होती. ती रडायची.
२० वर्षीय तुनिषाच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत २१ जणांचे जबाब नोंदवले आहेत. तुनिषाची आई वनिता, मामा पवन शर्मा आणि पर्सनल ड्रायव्हर यांचेही जबाब गुरुवारी नोंदवले जाणार आहेत. यासोबतच पालघरस्थित टीव्ही शो 'अली बाबा: दास्तान-ए-काबुल'च्या सेटवर जाऊन तुनिषाच्या आत्महत्येचा सीन पोलिस पुन्हा तयार करणार आहेत.
या प्रकरणात आतापर्यंतचा सर्वात खळबळजनक दावा तुनिषा शर्माची आई वनिता शर्मा यांनी केला आहे. त्यांनी शिजान खानवर ड्रग्ज घेतल्याचा आरोप केला आहे. वनिता शर्मा यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, शिजान खान ड्रग्ज सेवन करायचा. मात्र, तो अमली पदार्थ कधीपासून घेत होता, याची माहिती नाही. एवढेच नाही तर तुनिशाचे मामा पवन शर्माप्रमाणेच आता आईनेही शिजानला भेटल्यानंतर तुनिषाची जीवनशैली बदलल्याचे सांगितले आहे. तिने हिजाब घालायला सुरुवात केली होती आणि शिजान तिला उर्दू शिकवत होता. मुलीच्या मृत्यूनंतर शिजानने तिला मदत केली नाही.
वनिता शर्माने यापूर्वीही शिजानवर अनेक मुलींशी संबंध असल्याचा आरोप केला आहे. शिजानच्या व्हॉट्सअॅप चॅट्समधून पोलिसांना त्याच्या सिक्रेट गर्लफ्रेंडची माहिती मिळाली. आता पोलिसांनी या मैत्रिणीचीही चौकशी केल्याची माहिती समोर येत आहे. मात्र ही गर्लफ्रेंड कोण आहे याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पोलिसांचे म्हणणे आहे की, शनिवारी साडेतीन वाजता तुनिषाने तिच्या मेकअप रूममध्ये पंख्याला गळफास लावून घेतला, त्याच्या जवळपास २ तास आधी शिजानने सिक्रेट गर्लफ्रेंडशी बोलला होता.