Shocking : ‘महाकाली’तील गगन कांग आणि अरजीत लावनिया यांचा कार अपघातात जागीच मृत्यू!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2017 02:53 PM2017-08-19T14:53:53+5:302017-08-19T21:03:45+5:30
टीव्ही जगतातून अतिशय दु:खद आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे. होय, अभिनेता गगन कांग आणि अरजीत लावनिया या दोन ...
ट व्ही जगतातून अतिशय दु:खद आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे. होय, अभिनेता गगन कांग आणि अरजीत लावनिया या दोन उदयोन्मुख कलाकारांचा भीषण कार अपघातात जागीच मृत्यू झाला आहे. वृत्तानुसार, दोघेही त्यांच्या ‘महाकाली’ या मालिकेची शूटिंग पूर्ण करून परतत होते. मात्र रस्त्यातच काळाने त्यांच्यावर घाला घातला. ही घटना आज सकाळी सुमारे १०.३० वाजेच्या दरम्यान ‘मुंबई-अहमदाबाद’ हायवेवर घडली. मालिकेत गगन इंद्राची तर अरजीत नंदीची भूमिका साकारत होते.
उपलब्ध माहितीनुसार गगन ड्रायव्हिंग करीत होता. हॉटेल माउंटेनजवळ आल्यानंतर त्याचे कारवरील नियंत्रण सुटले अन् त्याची कार थेट एका कंटेनरला जाऊन धडकली. हा अपघात एवढा भीषण होता की, दोन्ही कलाकारांचा जागीच मृत्यू झाला. ‘महाकाली’ शोमधील त्यांची सहकलाकार निकिता शर्मा हिने इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना म्हटले की, ‘मला अजूनही विश्वास बसत नाही की, हे दोघे आमच्यात नाहीत. काही तासांपूर्वी जेव्हा सर्व लोक शूटिंग करीत होते अन् ही बातमी समजली तेव्हा सगळ्यांनाच धक्का बसला. गगनच्या आईची प्रकृती अगोदरच अस्वस्थ असून, ही बातमी ऐकून त्यांची काय स्थिती होईल याचा विचारही करवत नाही. मी देवाकडे प्रार्थना करते की, त्यांना यासाठी शक्ती द्यावी. ही बातमी ऐकल्यानंतर आम्हा सर्वांनाच धक्का बसला आहे, यावर काहीही बोलण्याची आमची मानसिकता नाही.’
टाइम्स आॅफ इंडियाने दिलेल्या रिपोर्टनुसार, पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. तसेच ते या प्रकरणाचा कसून तपासही करीत आहेत. या अपघाताविषयी आणखी सविस्तर माहिती मिळविण्यासाठी अवधी लागणार असून, पोलीस त्या दिशेने तपास करीत आहेत. जोपर्यंत ठोस माहिती उपलब्ध होत नाही, तोपर्यंत कुठलेही आॅफिशियल स्टेटमेंट दिले जाणार नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे या दोघांव्यतिरिक्त आणखी एक व्यक्ती कारमध्ये असल्याची माहिती समोर येत आहे. ही व्यक्तीदेखील ‘महाकाली’ मालिकेशी संबंधित असून, तिचाही जागीच मृत्यू झाल्याचे समजते. पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
गगन आणि अरजीत खूप चांगले मित्र होते. दोघेही ‘महाकाली’ नावाच्या मालिकेत काम करीत होते. मालिकेत गगन इंद्राची तर अरजीत नंदीची भूमिका साकारत होता. या मालिकेव्यतिरिक्त गगन सोनी टीव्हीवरील ‘केसरी’ या मालिकेत हनुमानच्या वडिलांची भूमिका साकारत होता.

}}}} ">Maharashtra: 3 people dead after a container hit a car on Mumbai- Ahmedabad highway near Palghar's Manor town. pic.twitter.com/JkXuNMzQCw— ANI (@ANI) August 19, 2017
Maharashtra: 3 people dead after a container hit a car on Mumbai- Ahmedabad highway near Palghar's Manor town. pic.twitter.com/JkXuNMzQCw— ANI (@ANI) August 19, 2017