'CID' फेम अभिनेता हृषिकेश पांडेसोबत घडला धक्कादायक प्रकार, वाचून व्हाल हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2022 06:36 PM2022-06-13T18:36:37+5:302022-06-13T18:37:01+5:30

Hrishikesh Pandey: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'CID' मधील प्रसिद्ध अभिनेता हृषिकेश पांडे याच्यासोबत नुकतीच एक धक्कादायक घटना घडली आहे.

Shocking incident happened with 'CID' fame actor Hrishikesh Pandey | 'CID' फेम अभिनेता हृषिकेश पांडेसोबत घडला धक्कादायक प्रकार, वाचून व्हाल हैराण

'CID' फेम अभिनेता हृषिकेश पांडेसोबत घडला धक्कादायक प्रकार, वाचून व्हाल हैराण

googlenewsNext

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'CID' मधील प्रसिद्ध अभिनेता हृषिकेश पांडे (Hrishikesh Pandey) याच्यासोबत नुकतीच एक धक्कादायक घटना घडली आहे. सीआयडीमध्ये इन्स्पेक्टरची भूमिका साकारणाऱ्या हृषिकेशसोबत नुकतीच चोरीची घटना मुंबईत घडली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्याच्याकडून रोख रक्कम, त्याच्या पर्सनल वस्तू आणि इतर अनेक गोष्टी देखील चोरीला गेल्या आहेत.

हृषिकेश आपल्या कुटुंबासह बसमधून प्रेक्षणीय स्थळी पर्यटनासाठी निघाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यावेळी त्याने स्लिंग बॅग सोबत घेतली होती. यादरम्यान चोरट्यांनी त्याचे सगळे सामान लुटले.  मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही घटना ५ जूनची आहे. मात्र आता याचा खुलासा झाला आहे. या घटनेबाबत एका वेबसाईटशी बोलताना हृषिकेश पांडेने सांगितलं की, त्याने कुटुंबासह एलिफंटा लेणीला भेट दिल्यानंतर कुलाब्यातील ताडदेव येथे जाण्यासाठी बसमध्ये बसला होता.

त्याने सांगितले की, 'आम्ही साडेसहा वाजता एसी बसमध्ये बसलो होतो. मी एक स्लिंग बॅग घेतली होती. बसमधून उतरल्यावर मी माझी स्लिंग बॅग तपासली. माझी रोख रक्कम, क्रेडिट कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि इतर कागदपत्रं बॅगेमधून गायब होती. याबाबत मी तात्काळ कुलाबा पोलीस ठाणे आणि मालाड पोलीस ठाण्यात माहिती दिली. 
अभिनेता हृषिकेश पुढे म्हणाला की, त्याची मुख्य चिंता ही त्याने गमावलेली ओळख कागदपत्रे आहेत कारण त्यांचा गैरवापर होऊ शकतो. पोलीस विभाग लवकरच या प्रकरणाचा उलगडा करेल अशी आशा अभिनेत्याला आहे. 

Web Title: Shocking incident happened with 'CID' fame actor Hrishikesh Pandey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.