Shocking! 'इंडियन आयडॉल १२'मध्ये नवीन ट्विस्ट, निर्मात्यांनी घेतला हा मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2021 12:51 PM2021-07-01T12:51:48+5:302021-07-01T12:52:13+5:30

'इंडियन आयडॉल १२'च्या सर्व स्पर्धकांना घरी पाठवण्यात आले आहे.

Shocking! A new twist in 'Indian Idol 12', a big decision taken by the producers | Shocking! 'इंडियन आयडॉल १२'मध्ये नवीन ट्विस्ट, निर्मात्यांनी घेतला हा मोठा निर्णय

Shocking! 'इंडियन आयडॉल १२'मध्ये नवीन ट्विस्ट, निर्मात्यांनी घेतला हा मोठा निर्णय

googlenewsNext

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय सिंगिंग रिएलिटी शो इंडियन आयडॉल १२ सातत्याने वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत येत असतो. आता असे वृत्त येत आहे की निर्मात्यांनी शोच्या बाबतीत मोठा निर्णय घेतला आहे. असे सांगितले जात आहे की सर्व स्पर्धकांना त्यांच्या घरी पाठवण्यात आले आहे. मागील तीन महिन्यांपासून शोचे शूटिंग दमणमध्ये सुरू होते. मात्र मुंबईत अनलॉक झाल्यानंतर सर्वजण मुंबईत परतले आहेत. जेव्हा स्पर्धक मुंबईत आले तेव्हा निर्मात्यांनी त्यांना घरी जाण्यास सांगितले.


गायकांना घरी पाठवण्यामागे मोठे कारण आहे. निर्मात्यांनी निर्णय घेतला आहे की, सर्व गायक आपल्या घरी जाऊन जवळपासच्या स्थानिक लोकांना मत देण्याचे आवाहन केले आहे. यासोबतच सोशल मीडियावर स्वतःचे व्हिडीओ बनवून पोस्ट करा. या शोचा अंतिम सोहळा लवकरत पार पडणार आहे. सर्व स्पर्धकांमध्ये कांटे की टक्कर होणार आहे. ज्याला जास्त मते मिळतील, तोच हा शोचा विजेता ठरणार आहे. निर्मात्यांनी या सीझनला नवीन ट्विस्ट देत हे पाऊल उचलले आहे.


इंडियन आयडॉल १२ शोमध्ये आता पवनदीप राजन शिवाय अरुणिता कांजीलाल, मोहम्मद दानिश, शनमुखप्रिया, सायली कांबळे आणि आशिष कुलकर्णी हे स्पर्धक राहिले आहेत आणि त्यांच्यात स्पर्धा होणार आहे. सर्व स्पर्धक आपापल्या घरी रवाना झाले आहेत आणि तिथून आपले चाहते, प्रेक्षक आणि जवळच्या लोकांचे मनोरंजन करत आहेत.


पवनदीप राजन आपल्या घरी उत्तराखंडला पोहचला आहे. तिथे तो उत्तराखंडचे मुख्यमंत्रींना भेटला आणि त्यांना गाणेदेखील ऐकविले. पवनदीपचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. इंडियन आयडॉल १२ शोमध्ये सात स्पर्धक राहिले आहेत. नुकतेच सवाई भट आणि अंजली गायकवाड एलिमिनेट झाले आहेत.

Web Title: Shocking! A new twist in 'Indian Idol 12', a big decision taken by the producers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.