धक्कादायक Bigg Boss 15 घरातच प्रेग्नंट राहिली ही स्पर्धक, काय आहे व्हिडीओमागचं सत्य ?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2021 02:01 PM2021-12-20T14:01:31+5:302021-12-20T14:01:40+5:30
बिग बॉस 15 (Bigg Boss 15) चा एक नवीन प्रोमो रिलीज झाला आहे ज्यामध्ये गोविंदा (Govinda) आणि सलमान खान (Salman Khan) एकत्र दिसत आहेत. दुसरीकडे, या प्रोमोमध्ये तेजस्वी प्रकाश म्हणते की ती आई होणार आहे असे तिला वाटत असल्याचे सांगते.
छोट्या पडद्यावरील रियालिटी शो बिग बॉस सीझन १५ (Bigg Boss15) सध्या विविध कारणांमुळे चर्चेत आहे. घरातील सदस्यांमध्ये दिवसागणिक होणारे वाद यामुळे बिग बॉस सुरुवातीच्या काही भागातच हिट ठरला.बिग बॉसच्या घरात अचानक काही स्पर्धकांमध्ये वाद होतात, तर काहींमध्ये जवळीक वाढताना दिसते. त्यामुळे या घरात स्पर्धक कधी कोणाशी कसे वागतील याचा काही नेम नाही. घरात अनेकदा स्पर्धकांची नोकझोक होत असल्याचे व्हिडीओ समोर येत असतात. अशाच एका व्हिडीओमुळे स्पर्धक तेजस्वीची चांगलीच चर्चा रंगत आहे. इतकेच काय तर तेजस्वी (Tejaswi Prakash) घरातच प्रेग्नंट राहिल्याची माहिती खुद्द तेजस्वीच सांगताना दिसत आहे.
अलीकडेच, बिग बॉस 15 चा एक नवीन प्रोमो रिलीज झाला आहे ज्यामध्ये गोविंदा आणि सलमान खान एकत्र दिसत आहेत. दुसरीकडे, या प्रोमोमध्ये तेजस्वी प्रकाश म्हणते की ती आई होणार आहे असे तिला वाटते. तेजस्वी प्रकाशची ही चर्चा ऐकून उमर रियाझसह सगळेच थक्क झाले आहेत.सलमान खान (Salman Khan) आणि गोविंदा( Govinda) तेजस्वी प्रकाशला प्रँक करायला सांगतात. तेजस्वी प्रकाश सर्वांना सांगते की तिला गॅस झाला आहे, जे ऐकून प्रत्येक स्पर्धकाला आश्चर्याचा धक्काच लागतो.
त्याचे झाले असे की, तेजस्वी प्रकाश आणि उमरजवळ गप्पा मारताना दिसते. उमरशी बोलताना तेजस्वी म्हणते की, "मला गॅस झाला आहे."यावर उमर मात्र तिची खिल्ली उडवत हसत असतो. हे पाहून तेजस्वी चिडते आणि म्हणते की, हा विनोदाचा विषय नाही. "मी आई बनणार आहे." हे ऐकून उमरच्या पायाखालची जमीनच घसरते.'' हे तू काय बोलतेस'' असे उमर तिला विचारतो.यावर तेजस्वी बोलते ''गॅसमुळे मुलगी प्रेग्नंट तरी राहू शकते का?'' तेजस्वीचे बदलले उत्तर ऐकून उमरला यावर काय बोलावे हेच सुचत नाही.
तुर्तास तेजस्वीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. तेजस्वीचे उगाच असे बेधडक बोलणे पाहून तिला सोशल मीडियावर ट्रोलही केले जात आहे. तिच्या खोडकर अंदाजामुळे ती तशीच आवडती स्पर्धक असली तरी सध्याचे तिचे असे वागणं पाहून चाहते मात्र संताप व्यक्त करताना दिसत आहेत.