Shocking ! स्प्लिट्सव्हिला फेम या मॉडेलने कास्टिंग काऊचबाबत केला खळबळजनक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2020 12:29 PM2020-01-09T12:29:53+5:302020-01-09T12:30:38+5:30

स्प्लिट्सव्हिलामधून बाहेर पडल्यानंतर हा मॉडेल खूप चर्चेत आला होता.

Shocking! Splitsvilla Fame model made sensational revelations about casting cows | Shocking ! स्प्लिट्सव्हिला फेम या मॉडेलने कास्टिंग काऊचबाबत केला खळबळजनक खुलासा

Shocking ! स्प्लिट्सव्हिला फेम या मॉडेलने कास्टिंग काऊचबाबत केला खळबळजनक खुलासा

googlenewsNext

तरूणांमध्ये लोकप्रिय असलेला शो एमटीव्ही स्प्लिट्सव्हिला फेम आकाश चौधरी सोशल मीडियावर चर्चेत असतो. मात्र सध्या तो शोनंतर आपल्याच धुंदीत असतो. एमटीव्ही स्प्लिटव्हिलामध्ये प्रियांक शर्मा असतानाच्या सीझनमध्ये आकाश सहभागी झाला होता. या शोमधून बाहेर पडल्यानंतर आकाश चौधरीने धक्कादायक खुलासा केला होता.

आकाशने निर्माते व शोचा होस्ट रणविजय सिंगबाबत धक्कादायक विधान केलं होतं. आकाशने टेलीचक्करला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं की, रणविजय ज्याप्रमाणे आपल्या आवडत्या स्पर्धकांना सपोर्ट करतो हे सरळ सरळ दिसते.


त्यानंतर असे वृत्त आले होते की आकाशने कोणाच्या तरी सांगण्यावरून असं म्हटलं होतं. नुकतेच त्याने बॉलिवूड लाइफला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, मी जे बोललो त्याचा मला अजिबात पश्चाताप होत नाही. मी असे म्हणणार की मी बोललेल्या सगळ्या गोष्टी चुकीच्या होत्या. पण कदाचित गरजेच्या नव्हत्या.


तो पुढे म्हणाला की, शालेय जीवनात मला खूप त्रास सहन करावा लागला आहे. शाळेतील मुले मला नेहमी खूप त्रास द्यायचे. मी फिजिकली जास्त फिट नव्हतो. त्यामुळे मी पीटी क्लासला जायचो नाही. कारण ते लोक मला त्रास देतील.


सिनेइंडस्ट्रीबद्दल बोलताना आकाश म्हणाला की, इथे पैसा आहे, नाव व संपत्ती आहे. पण, तुम्ही माणुसकीपासून दूर जाता. तुम्ही जीवनात एकटे राहतात.
तो पुढे म्हणाला की, भारतात मेल मॉडेल्सचा वापर खेळण्यासारखा केला जातो. ते लोकांच्या इगोला संतुष्ट करतात. 


आकाशने कास्टिंग काऊचचा अनुभव सांगिताना म्हणाला इथे प्रत्येकाला तुमच्यासोबत झोपायचे असते.

Web Title: Shocking! Splitsvilla Fame model made sensational revelations about casting cows

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.