गौरीची पहिली मंगळागौरीत आले मोठे विघ्न?, पाहून रसिकांनाही बसेल धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2021 05:09 PM2021-08-11T17:09:57+5:302021-08-11T17:21:01+5:30
श्रावण महिना आला की चाहूल लागते ती सणांची. श्रावणातल्या मंगळवारी मंगळागौरीची पूजा केली जाते. मंगळागौरीच्या सणाचा जल्लोष ‘सुख म्हणजे नक्की असतं’ मालिकेतही पाहायला मिळणार आहे.
'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेने अल्पावधीतच रसिकांची पसंती मिळवली. मालिकेचे कथानक आणि कलाकारांचा दमदार अभिनय यामुळे रसिकही मालिकेला खिळून आहे. दिवसेंदिवस रंजक घडामोडींमुळे रसिकांची ही मालिका आवडती बनली आहे. त्यामुळे मालिकेत आता काय घडणार हे पाहण्यासाठी रसिकांचीही प्रचंड उत्सुकता असते.आता मालिका रंजक वळणावर आली आहे.
श्रावण महिना आला की चाहूल लागते ती सणांची. यामध्ये मंगळागौरीचेही विशेष महत्त्व असते. श्रावणातल्या मंगळवारी मंगळागौरीची पूजा केली जाते. श्रावणातल्या मंगळवारी नवविवाहितेने मंगळागौरीचं व्रत करण्याची प्रथा आहे. आजही ही प्रथा तितक्याच श्रद्धेने केली जाते. प्रत्यक्षात रंगणारे मंगळागौरीचे खेळ आता रसिकांना छोट्या पडद्यावरही पहायला मिळणार आहेत. मंगळागौरीच्या सणाचा जल्लोष ‘सुख म्हणजे नक्की असतं’ मालिकेतही पाहायला मिळणार आहे.
या मालिकेच्या माध्यमातून रसिकांना मंगळागौरीचा सोहळा अनुभवायला मिळणार आहे. गौरीची पहिलीच मंगळागौर असल्यामुळे साग्रसंगीत पूजा पार पडणार आहे. नऊवारी साडी, पारंपरिक दागिने असा शिर्केपाटील कुटुंबातील सर्वच स्त्रियांचा थाट विशेष लक्ष वेधणार आहे. लाडक्या सुनेसाठी माई म्हणजेच नंदिनी शिर्केपाटील यांनी देखिल मंगळागौरीच्या खेळामध्ये सहभाग घेतला आहे. घरामध्ये आनंदाच वातावरण पसरलंय. सगळेच मगंळागौर उत्साहात साजरे करताना दिसणार आहे.
एकीकडे उत्साहाचं वातावरण असताना जयदीपच्या अटकेने मात्र आनंदाला गालबोट लागणार आहे. मंगळागौरीची पूजा सुरु असतानाच जयदीपला अटक करण्यासाठी पोलीस दाखल होतात. जयदीपचा नेमका गुन्हा काय हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. गौरीच्या पहिल्या मंगळागौरीच्या पुजेत आलेलं हे विघ्न कसं दूर होणार हे मालिकेच्या पुढील भागांमधून उलगडेल.