'आई कुठे काय करते'मध्ये धक्कादायक वळण, संजनानी केला आत्महत्येचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2022 11:30 AM2022-05-04T11:30:39+5:302022-05-04T11:38:44+5:30
'आई कुठे काय करते' उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. संजनाने केला आत्महत्येचा प्रयत्न.
स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'आई कुठे काय करते' उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. सध्या अनिरुद्ध आणि संजनाच्या नात्यात तणाव आलायं. दोघांमध्ये सारखी भांडण होतायेत. अनिरुद्ध तिला वारंवार घटस्फोट देण्याची धमकी देतो आहे आणि काही झालं तरी आपण अनिरुद्धला सोडणार नाही यानिर्णयावर संजना ठाम आहे. आपण काही अरुंधतीही नाही घर सोडून जायला असं अनेकवेळा संजना अनिद्धला म्हणाली.
सोशल मीडियावर एक प्रोमो व्हायरल होतोय. यात संजनाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे दिसतंय. अनघा अरुंधतीशी फोनवर बोलत असताना तिला हॉलमध्ये संजनाने खुर्चीवर पडलेल्या अवस्थेत दिसत. ती धावत जाऊन संजनाला हलवण्याचा प्रयत्न करते मात्र ती काहीच प्रतिसाद देत नाही. मग ती अभीला आवाज देते. काका सगळ्यांना आवाज देते. अनिरुद्ध, अभी, आप्पा आणि शेखर सगळे धावत येतात. अभीला संजनाच्याजवळ झोपेच्या गोळ्या सापडतात. तिकडे अरुंधतीचा फोन सुरूच असतो म्हणून तीही घाबरते.
आता यातून संजनाचा जीव अभी वाचवू शकतो का?, संजनाने केलेल्या आत्महत्याच्या प्रयत्नाचे परिणाम देशमुख कुटुंबावर होतील का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.