'रंग माझा वेगळा'मध्ये धक्कादायक वळण, कार्तिक दीपाच्या नात्यात येणार या कारणामुळे कायमचा दुरावा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2022 01:08 PM2022-06-16T13:08:16+5:302022-06-16T13:09:01+5:30

Rang Maza Vegla: 'रंग माझा वेगळा' मालिका सध्या उत्कंठावर्धक वळणावर आली आहे.

Shocking turn in 'Rang Maza Vegla', Karthik will be in a relationship with Deepa | 'रंग माझा वेगळा'मध्ये धक्कादायक वळण, कार्तिक दीपाच्या नात्यात येणार या कारणामुळे कायमचा दुरावा

'रंग माझा वेगळा'मध्ये धक्कादायक वळण, कार्तिक दीपाच्या नात्यात येणार या कारणामुळे कायमचा दुरावा

googlenewsNext

स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवरील 'रंग माझा वेगळा' (Rang Maza Vegla) मालिकेने कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. सध्या ही मालिका उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. दीपिका आणि कार्तिकी दीपा आणि कार्तिकला एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहेत. तर नुकतेच कार्तिकीला कार्तिक तिचा बाबा असल्याचे समजते. दरम्यान कार्तिकवर मोठ्या अडचणीत सापडला आहे. कोर्टात लग्नासाठी न पोहचल्यामुळे आयशाने कार्तिकविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे त्याला अटक करण्यात आली आहे. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोत पाहायला मिळतंय की मालिकेत धक्कादायक वळण येणार आहे. आता कार्तिक आणि दीपाच्या नात्यात कायमचा दुरावा येणार आहे.

मालिकेत पाहायला मिळाले की, कोर्टात कार्तिकच्या विरोधात सर्व पुरावे आयशा देते आणि आयशाची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली कार्तिकला शिक्षा होणार असते. इतक्यात तिथे दीपा जयराम कुलकर्णी यांना घेऊन येते. सर्वांसमोर आयशाचा खरा चेहरा आणते. त्यामुळे कार्तिक आयशाच्या आरोपातून मुक्त होतो.  


रंग माझा वेगळा मालिकेचा नवीन प्रोमो समोर आला आहे. त्यात पाहायला मिळत आहे की, आयशा हॉस्पिटलच्या कपड्यात पाहायला मिळते आहे आणि ती रस्त्यावर गाडी खाली येण्याचा प्रयत्न करत आहे. त्यावेळी दीपा तिला वाचवते आणि तिला वचन देते की, कार्तिक आणि तुझं लग्न मी लावून देते. हे ऐकल्यावर आयशा शांत होते. दीपाने आयशाला दिलेल्या वचनामुळे आता कार्तिक आणि दीपामध्ये कायमचा दुरावा येणार आहे. आता मालिकेत पुढे काय घडणार, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. 

Web Title: Shocking turn in 'Rang Maza Vegla', Karthik will be in a relationship with Deepa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.