'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेत धक्कादायक वळण, जयदीप रचणार गौरीच्या हत्येचा कट?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2022 06:09 PM2022-02-25T18:09:20+5:302022-02-25T18:35:22+5:30
Sukh Mhanje Nakki Kay Asata: गौरी आई होऊ शकत नाही असे खोटे रिपोर्ट्स मानसीने शालिनीच्या मदतीने तयार केले. गौरीसमोर हे सारं सत्य उघड झालं आहे
स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ (Sukh Mhanje Nakki Kay Asata)ने कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील सर्वच पात्रांनी रसिकांच्या मनात घर केले आहे. मालिका अतिशय रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. आपण आई-बाबा होऊ शकणार नाही ही गोष्ट लक्षात येताच जयदीप गौरीने सरोगसीद्वारे मुलाला जन्म देण्याचं ठरवलं. यासाठी मानसीने पुढाकारही दाखवला. मात्र मानसीचा खरा डाव आता गौरीला कळला आहे. गौरी आई होऊ शकत नाही असे खोटे रिपोर्ट्स मानसीने शालिनीच्या मदतीने तयार केले. गौरीसमोर हे सारं सत्य उघड झालं आहे.शालिनी आणि मानसीचं षडयंत्र गौरी जयदीपला सांगण्याचा प्रयत्न करते.
स्टार प्रवाहने नुकत्याच प्रसारीत केलेल्या प्रोमोमध्ये गौरी जयदीपला आपण आई होणार असल्याचं सांगतं. ज्या मानसीला आपण बहीण मानत होते तिने आपल्याला फसवलं असल्याचं सांगते. मात्र जयदीप गौरीसमोर मानसीच्या हाताला kiss करतो आणि गौरीला उंच कड्यावरून ढकलून देत असल्याचे प्रोमोमध्ये दिसते आहे.
गौरीवर जीवापाड प्रेम करणाऱ्या जयदीपने असा टोकाचा निर्णय का घेतला? गौरी या जीवघेण्या हल्ल्यातून बचावेल का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मालिकेच्या पुढील भागांमधून उलगडणार आहेत.