'# लय आवडतेस तू मला'मध्ये धक्कादायक वळण, सरकार सानिकाच्या लग्नात येणार विघ्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 17:03 IST2025-01-28T17:02:40+5:302025-01-28T17:03:22+5:30

Hashtag Lay Aavadtes Tu Mala Serial : सध्या '# लय आवडतेस तू मला' मालिकेमध्ये सानिका आणि सरकारच्या आयुष्यात अनेक घटना घडत आहेत.

Shocking twist in 'Hashtag Lay Aavadtes Tu Mala', Sarkar will face obstacles in Sanika's marriage | '# लय आवडतेस तू मला'मध्ये धक्कादायक वळण, सरकार सानिकाच्या लग्नात येणार विघ्न

'# लय आवडतेस तू मला'मध्ये धक्कादायक वळण, सरकार सानिकाच्या लग्नात येणार विघ्न

सध्या  '# लय आवडतेस तू मला' (Hashtag Lay Aavadtes Tu Mala Serial) मालिकेमध्ये सानिका आणि सरकारच्या आयुष्यात अनेक घटना घडत आहेत. पंकजा, सर्वेश आणि त्यात भर म्हणजे सईने रचलेल्या जाळ्यात सानिका अडकते आणि सरकारवर असलेल्या विश्वासाला तडा जातो. आणि तेव्हापासून दोघांचे नाते एका नाजूक वळणावर येऊन पोहचले होते. सानिका सरकारच्या गोड नात्याला सईची दृष्ट लागता लागता प्रेम शेवटी जिंकते असं म्हणायला हरकत नाही. खूप कट कारस्थानांना सामोरे जात अखेर सानिकाला झालेला गैरसमज दूर होतो आणि तिला विश्वास पटतो की सरकारने तिला त्यांच्याबद्दलचे खरं सांगितले होते. 

मालिकेत आता बघायला मिळाले की, सरकार सानिकाला सई त्याच्या मामाची मुलगी आहे आणि तिला दोघांमध्ये दुरावा आणि वाद घडवून आणायचे आहेत म्हणून ती नाटक करतेय. सानिकाला सरकारचे म्हणणे पटते. सानिका सईला हाकलवायला जाते. सई सानिकावर हल्ला करते ते बघून साहेबराव रागाने सईला घराबाहेर काढतात. हे घडत असताना सानिका - सरकार यांच्या नात्याबद्दल सावित्रीला कळते. सानिका सरकार सावित्रीसमोर प्रेमाची कबुली देतात. याचे वाईट परिणाम दोघांना भोगायला लागतील म्हणून सावित्री त्यांना पळून जाण्याचा सल्ला देते. सावित्री समजावते सानिका आणि सरकारला पळून जाण्याशिवाय पर्याय नाही. 


प्रत्येक मुलीच्या आयुष्यात लग्न ही खूप महत्वाची घटना असते... कारण यानंतर तिचे संपूर्ण आयुष्यच बदलून जाते. ती स्वत:च घर सोडून दुसऱ्या घरी जाते. लवकरच सरकार आणि सानिका देखील बाप्पाच्या साक्षीने या बंधनात अडकणार आहेत. पण, त्याच दरम्यान साहेबराव त्यांचे लग्न मोडण्यासाठी देवळात येऊन सरकारवर गोळी झाडतात. सरकार सानिकाच्या लग्नातील विघ्न बाप्पा कसे दूर करणार ? आता पुढे नक्की काय होणार ? सानिका आणि सरकारचे नाते पुढे कुठल्या वळणावर येणार?  या सगळ्या गुंतागुंतीच्या गोष्टीमधून नक्की मालिकेत पुढे काय घडणार ? हे बघणे रंजक असणार आहे. # लय आवडतेस तू मला माघी गणेश जयंती विशेष भाग २ फेब्रुवारी दुपारी ३ वाजता आणि संध्याकाळी ७ वाजता कलर्स मराठीवर पाहायला मिळणार आहे.
 

Web Title: Shocking twist in 'Hashtag Lay Aavadtes Tu Mala', Sarkar will face obstacles in Sanika's marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.