'पुन्हा कर्तव्य आहे' मालिकेत धक्कादायक वळण, आकाश आणि वसुंधराचा जीव धोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 17:48 IST2025-01-29T17:47:18+5:302025-01-29T17:48:15+5:30

Punha Kartavya Aahe : 'पुन्हा कर्तव्य आहे' सध्या खूप घडामोडी घडताना दिसत आहेत.

Shocking twist in the series 'Punha Kartavya Aahe', Akash and Vasundhara's lives are in danger | 'पुन्हा कर्तव्य आहे' मालिकेत धक्कादायक वळण, आकाश आणि वसुंधराचा जीव धोक्यात

'पुन्हा कर्तव्य आहे' मालिकेत धक्कादायक वळण, आकाश आणि वसुंधराचा जीव धोक्यात

'पुन्हा कर्तव्य आहे' (Punha Kartavya Aahe Serial) सध्या खूप घडामोडी घडताना दिसत आहेत. एका बाजूला वसुंधराचे पाय पकडून विशाखा मदतीसाठी विनंती करतेय. वसुंधराची एक अट आहे की विशाखाने एक कोऱ्या कागदावर सही करावी. सही केल्यावर वसुंधरा त्या कागदावर लिहिते की तनयाला घरातील सगळे काम एकटीने करावी लागतील. तनया सगळी घरकामं एकटीनेच करतेय, ज्यामुळे ती विशाखावर चिडू लागलीय. या सगळ्यात तनया अचानक बेशुद्ध पडते, यात ती गरोदर असल्याचे निदान होते. हे ऐकून घरातील सगळे आनंदित आहेत. 

पण तनया खरेच गरोदर आहे ? तनया तिच्या गरोदरपणाचा फायदा घेत इतरांना घरची कामे पूर्ण करायला लावते. ती स्वतःची खोली बदलून मोठी खोली मागते, ज्यामुळे वसुंधरा, आकाश आणि त्यांच्या मुलांना लहान खोलीत जावे लागते. एवढे असूनही वसुंधरा आणि तिचं कुटुंब आनंदी आहे. ज्यामुळे तनयाला अजूनच चिड येते. दरम्यान, वसुंधराला कळते की विशाखाला कोणीतरी व्यक्ती ब्लॅकमेल करतेय. ब्लॅकमेल करणारा तोच व्यक्ती आहे, ज्याने यापूर्वी आकाशवर गोळी झाडली होती.


आकाश ठरवतो की वसुंधरा आणि मुलांसोबत वेळ घालवण्यासाठी ते सगळे एकत्र सहलीला जातील. सहलीची तयारी करत असताना, वसुंधराला काही धागेदोरे मिळतात, ज्यामुळे तिला वाटतं की तनया, विशाखा आणि अखिल तिच्या आणि आकाशविरोधात कट करत आहेत. वसुंधराला संशय येतो की तनया आणि विशाखाच्या लकी सोबत काहीतरी प्लॅन करतायत. विशाखा ने आकाश आणि वसुंधरा संपवण्याचा निर्धार केला आहे. काय आहे विशाखाचा प्लान? खरेच आकाश आणि वसुंधराचा जीव धोक्यात आहे का? हे पाहावे लागेल.

Web Title: Shocking twist in the series 'Punha Kartavya Aahe', Akash and Vasundhara's lives are in danger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.