'तुला शिकवीन चांगला धडा'मध्ये धक्कादायक वळण, अधिपतीच्या रागाने उद्धवस्त होईल अक्षराचा संसार ?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2024 02:53 PM2024-01-16T14:53:23+5:302024-01-16T14:53:43+5:30

Tula Shikvin Changala Dhada : 'तुला शिकवीन चांगलाच धडा' मध्ये अक्षरा आणि भुवनेश्वरीची लढाई एका वेगळ्या वळणावर पोहचली आहे.

Shocking twist in 'Tula Shikavin Changala Dhada', Akshara's world will be disturbed by the anger of the ruler? | 'तुला शिकवीन चांगला धडा'मध्ये धक्कादायक वळण, अधिपतीच्या रागाने उद्धवस्त होईल अक्षराचा संसार ?

'तुला शिकवीन चांगला धडा'मध्ये धक्कादायक वळण, अधिपतीच्या रागाने उद्धवस्त होईल अक्षराचा संसार ?

झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'तुला शिकवीन चांगलाच धडा'(Tula Shikvin Changala Dhada) मध्ये  सध्या प्रेक्षकांना नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. अधिपतीचे वडील म्हणजेच चारुहासची वाचा परत आणण्यासाठी अक्षरा खूप प्रयत्न करत असते. अखेर तिच्या प्रयत्नांना यश येऊन चारुहास बरा होतो. अक्षरा देवीसमोर प्रार्थना करत असताना तो सूनेला तथास्तू म्हणतो. सासऱ्यांना ठणठणीत बरे झालेले पाहून अक्षरा आनंदी होते. 

'तुला शिकवीन चांगलाच धडा' मध्ये अक्षरा आणि भुवनेश्वरीची लढाई एका वेगळ्या वळणावर पोहचली आहे. भुवनेश्वरी हिचे सगळ्यात मोठं सत्य अक्षरासमोर आले आहे. भुवनेश्वरी, अधिपतीची  खरी आई नाही हे सत्य ती अधिपतीला सांगायला जाते. अक्षरा सत्य सांगताना भुवनेश्वरीच्या अनेक गोष्टी अधिपती समोर आणते, हे सगळं अधिपती शांतपणे ऐकून घेतो. अक्षरा त्याला पटवून देते की कसं भुवनेश्वरी तुम्हाला अधोगतीकडे ढकलत आहे. 

आई बद्दल इतकं ऐकल्यावर अधिपतीचा पारा चढतो आणि तो अक्षरावर हात उचलतो. पहिल्यांदाच अक्षरा आणि अधिपतीमध्ये वाद इतक्या टोकेला पोहचतो. अक्षरा, अधिपतीच वागणं पाहून अधिपतीला सोडून जाईल का? अधिपती समोर भुवनेश्वरीच सत्य समोर आणण्याचा ध्यास अक्षरा सोडून देईल का? या सर्व प्रश्नांचं उत्तरासाठी 'तुला शिकवीन चांगलाच धडा'  सोमवार ते शनिवार रात्री ८:०० वाजता फक्त झी मराठी वाहिनीवर पाहावी लागेल.
 

Web Title: Shocking twist in 'Tula Shikavin Changala Dhada', Akshara's world will be disturbed by the anger of the ruler?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.