लग्नासाठी केलं धर्मांतर, आता ७ वर्षांनी दीपिका आणि शोएब इब्राहिम घेणार घटस्फोट? अभिनेता म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 14:42 IST2025-03-04T14:42:44+5:302025-03-04T14:42:58+5:30
दीपिका आणि शोएब लग्नानंतर ७ वर्षांनी घटस्फोट घेत वेगळे होणार असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत. घटस्फोटाच्या चर्चा व्हायरल झाल्यानंतर दीपिका आणि शोएबने याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

लग्नासाठी केलं धर्मांतर, आता ७ वर्षांनी दीपिका आणि शोएब इब्राहिम घेणार घटस्फोट? अभिनेता म्हणाला...
दीपिका कक्कर आणि शोएब इब्राहिम हे टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय कपल आहे. त्यांना रुहान हा मुलगादेखील आहे. दीपिका आणि इब्राहिम सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं दिसतं. त्यांच्या युट्यूब चॅनेलवरुन व्हिडिओ शेअर करत ते दोघेही पर्सनल आयुष्याबाबत अपडेट देत असतात. मात्र, आता ते घटस्फोट घेत वेगळे होणार असल्याच्या चर्चा आहेत.
दीपिका आणि शोएब लग्नानंतर ७ वर्षांनी घटस्फोट घेत वेगळे होणार असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत. घटस्फोटाच्या चर्चा व्हायरल झाल्यानंतर दीपिका आणि शोएबने याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. युट्यूब चॅनेलवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दीपिका आणि शोएबने या सगळ्या अफवा असून घटस्फोट घेणार नसल्याचं सांगितलं आहे.
शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये शोएब त्याच्या कुटुंबीयांना त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगल्याचं सांगताना दिसत आहे. त्यानंतर कुटुंबीयही या चर्चांवर नाराजी व्यक्त करतात. नंतर घरातले सगळे मिळून शोएब आणि दीपिकासोबत रोजाचा उपवास सोडतात. दरम्यान, दीपिका आणि शोएबने २०१८ मध्ये निकाह करत नव्या आयुष्याला सुरुवात केली होती. दीपिकाचं हे दुसरं लग्न आहे. शोएबशी निकाह करण्यासाठी दीपिकाने धर्मांतर करत मुस्लीम धर्म स्वीकारला होता.