'ठरलं तर मग' मालिकेचं शूटिंग कुठे सुरू आहे हे तुम्हाला ठाऊक आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2024 12:50 PM2024-04-22T12:50:22+5:302024-04-22T12:50:53+5:30

'ठरलं तर मग'ने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे.

shooting of Jui Gadkari's serial 'Tharal Ter Mag' is currently going on in Madh. | 'ठरलं तर मग' मालिकेचं शूटिंग कुठे सुरू आहे हे तुम्हाला ठाऊक आहे का?

'ठरलं तर मग' मालिकेचं शूटिंग कुठे सुरू आहे हे तुम्हाला ठाऊक आहे का?

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'ठरलं तर मग'ने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. अर्जुन आणि सायलीवर प्रेक्षक भरभरून प्रेम करताना दिसतात. ही मालिका प्रेक्षकांना आवडतेय. या मालिकेतील कलाकार आणि कथानक जितकं चर्चेत असतं तितकीच चर्चा मालिकेतील मालिकेच्या शूटिंग लोकशनचीही होत असते. 'ठरलं तर मग' या मालिकेचं शूटिंग नेमकं कुठे पार पडतंय असा प्रश्न अनेकांना पडतो. तर या मालिकेचं शूटिंग कुठे सुरू आहे हे तुम्हाला ठाऊक आहे का?

'ठरलं तर मग' या मालिकेतील कालाकार सोशल मीडियावर बरेच सक्रिय असतात. सेटवरील मजामस्तीचे व्हिडीओ, फोटोज् ते नेहमी सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. या मालिकेतील मानसी हे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्री रुचिरा जाध हिनं नुकताच असाच सेटवरील एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. रुचिराने या मालिकेचा एक व्हिडीओ तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. त्यात त्यांचं संपूर्ण सेट दिसत आहे. अर्जुनच्या बेडरूमपासून ते गार्डन पर्यंत सगळा सेट या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. या मालिकेचं शुटिंग सध्या मढ येथे सुरू असल्याची माहिती आहे. 

'ठरलं तर मग' ही मराठी मालिका या प्रेक्षकांच्या मनात घरं करण्यात यशस्वी ठऱली आहे.  या मालिकेने काही महिन्यातच टीआरपी चार्टचा ताबा घेतला. गेले वर्षभर टीआरपीमध्ये ही मालिका पहिल्या क्रमांकावर आहे. या मालिकेने वर्षभर आपलं स्थान टिकवून ठेवलं आहे. या मालिकेत सतत काही ना काहीतरी नवीन आणि रंजक कथानक पाहायला मिळत आहे. याशिवाय सायली आणि अर्जुन यांची ही प्रेम कथा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. मालिकेत पुढे काय होते,  हे पाहण्यासाठीही प्रेक्षक कायम उत्सुक असतात.
 

Web Title: shooting of Jui Gadkari's serial 'Tharal Ter Mag' is currently going on in Madh.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.