पहरेदार पिया मालिकेच्या चित्रीकरणासाठी 250 तलवारींमधून निवडण्यात आली एक तलवार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2017 05:26 AM2017-05-09T05:26:18+5:302017-05-09T10:56:18+5:30

कोणताही कार्यक्रम सुरू व्हायच्या आधी त्या कार्यक्रमाचे चित्रीकरण कधी करायचे, कुठे करायचे, सेट कसा असणार या गोष्टींचा कार्यक्रमाच्या टीमला ...

For the shooting of the watchman Piya series, a sword was selected from 250 swords | पहरेदार पिया मालिकेच्या चित्रीकरणासाठी 250 तलवारींमधून निवडण्यात आली एक तलवार

पहरेदार पिया मालिकेच्या चित्रीकरणासाठी 250 तलवारींमधून निवडण्यात आली एक तलवार

googlenewsNext
णताही कार्यक्रम सुरू व्हायच्या आधी त्या कार्यक्रमाचे चित्रीकरण कधी करायचे, कुठे करायचे, सेट कसा असणार या गोष्टींचा कार्यक्रमाच्या टीमला विचार करावा लागतो. पहरेदार पिया की ही मालिका काहीच दिवसांत सोनी वाहिनीवर सुरू होणार आहे. या मालिकेची सध्या जोरदार तयारी सुरू आहे.
या मालिकेत प्रेक्षकांना छोट्याशा रतनची कथा पाहायला मिळणार आहे. रतन हा एक लहान मुलगा असला तरी त्याची जीवनशैली आणि त्याचे रूप हे राजेशाही आहे. त्याचे रूप मालिकेत खूप चांगले दिसावे आणि ही व्यक्तिरेखा जिवंत व्हावी यासाठी या मालिकेच्या टीमने खूप संशोधन केले आहे. तसेच या मालिकेत रतन तलवारी आणि ढाली वापरताना देखील दिसणार आहे. यावर देखील खूप अभ्यास करण्यात आला आहे.
या मालिकेच्या भव्यतेचा लोकांना अनुभव यावा यासाठी या मालिकेत वापरल्या जाणाऱ्या तलवारी आणि ढाली भारताच्या विविध भागांतून शोधून आणल्या गेल्या आहेत. तलावारी आणि ढाली मुख्यत्वे जयपूर, उदयपूर आणि सिरोही येथे तयार होतात. या साठी खास या मालिकेची टीम या भागांमध्ये गेली होती. राजेशाही कुटुंबांमध्ये या शस्त्रांची महत्त्वाची भूमिका असते. शुटिंग दरम्यान सुमारे 250 तलवारांची छाननी करून त्यातून एक तलवार निवडण्यात आली आहे. किएटिव्ह टीमने कुशल कारागिरांनी डिझाइन केलेली जवाहर जडित पात्याची तलवार या मालिकेसाठी निवडली आहे. 
पहरेदार पिया ही मालिका 9 वर्षांचा रतन हर्षवर्धन सिंह म्हणजेच अफान खान आणि 18 वर्षांची मुलगी दिया म्हणजेच तेजस्वी वायंगणकर यांच्या असामान्य विवाहाची कहाणी आहे. दिया आपल्या स्वतःच्या स्वप्नांचे बलिदान देऊन रतनच्या रक्षणार्थ त्याच्याशी विवाह करते अशी या मालिकेची कथा असून या मालिकेचे चित्रीकरण सध्या शेखावती प्रांताच्या मंडावा भागात सुरू आहे. 

Web Title: For the shooting of the watchman Piya series, a sword was selected from 250 swords

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.