'इंडियाज गॉट टॅलेंट' शो लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2021 07:43 PM2021-06-09T19:43:48+5:302021-06-09T19:44:18+5:30
इंडियाज गॉट टॅलेंट हा शो २०१८ नंतर आता पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे.
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो इंडियाज गॉट टॅलेंटला चाहत्यांची खूप पसंती मिळते. टॅलेंटने परिपूर्ण असलेल्या या शोची चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत. इंडियाज गॉट टॅलेंटचा ८वा सीझन प्रसारीत झाला आहे. आता या शोचा नववा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता या सीझनची घोषणा करण्यात आली आहे.हा शो २०१८ नंतर आता पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. मात्र यावेळी हा शो कलर्स वाहिनीवर नाही तर सोनी वाहिनीवर पहायला मिळणार आहे. सोनी कडून इंडियाज गॉट टॅलेंट शोची घोषणा करण्यात आली. अद्याप हा शो कधी प्रसारीत होणार आहे, हे समजू शकलेले नाही.
२००६ मध्ये अमेरिकाज गॉट टॅलेंटचे प्रसारण झाले, त्यानंतर ७० पेक्षा जास्त देशांमध्ये हा फॉरमॅट यशस्वीरित्या वापरण्यात आला. या फॉरमॅटमध्ये प्रतिष्ठित परीक्षकांचे पॅनेल देशभरातील होतकरू स्पर्धकांमधून काही स्पर्धक निवडते आणि मग अंतिम विजेता निवडण्याची जबाबदारी मात्र प्रेक्षकांकडे असते. हा फॉरमॅट अनेक प्रतिभावंतांना आपली प्रतिभा सादर करण्यासाठी मंच पुरवतो आणि तेथून जागतिक संधींचे दरवाजे त्यांच्यासाठी खुले करतो.
याबद्दल सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन अँड डिजिटल बिझनेसचे कन्टेट हेड आशिष गोळवलकर म्हणाले की, “एक फॉरमॅट म्हणून इंडियाज गॉट टॅलेंटमध्ये भरपूर क्षमता आहे. कथा बाह्य, प्रतिभा-प्रेरित रियालिटी फॉरमॅट प्रांतात हातखंडा असलेल्या सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनला प्रेक्षकांच्या अभिरुचीस अनुकूल कार्यक्रम सादर करण्याची आणखी एक संधी या फॉरमॅट द्वारे मिळाली आहे. फ्रेमॅन्टलकडून अधिकार मिळवून आता आम्ही इंडियाज गॉट टॅलेंटचा नवीन सीझन सादर करण्यासाठी तयारी करत आहोत. देशातील उत्कृष्ट प्रतिभा सादर करण्यास आम्ही उत्सुक आहोत.