श्रद्धा कपूरने स्वीकारले राजकुमार रावचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2018 06:00 IST2018-08-28T10:08:55+5:302018-08-29T06:00:00+5:30

कलर्सच्या डान्स दिवानेमध्ये आपला आगामी 'स्त्री' सिनेमाच्या प्रमोशनसाठी राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर आले होते. श्रद्धा आणि राजकुमार राव यांच्या ऑफस्क्रिन केमिस्ट्री प्रेक्षकांना पाहायला मिळाली.

Shraddha Kapoor accepted Rajkumar Rao's challenge | श्रद्धा कपूरने स्वीकारले राजकुमार रावचे आव्हान

श्रद्धा कपूरने स्वीकारले राजकुमार रावचे आव्हान

ठळक मुद्देस्त्री' सिनेमात श्रद्धा कपूर भूताच्या भूमिकेत दिसलेराजकुमार राव पीडित ट्रेलरच्या भूमिकेत असणार आहे

कलर्सच्या डान्स दिवानेमध्ये आपला आगामी 'स्त्री' सिनेमाच्या प्रमोशनसाठी राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर आले होते. श्रद्धा आणि राजकुमार राव यांच्या ऑफस्क्रिन केमिस्ट्री प्रेक्षकांना पाहायला मिळाली. यावेळी किशन आणि करन या दोन लहान मुलांनी सादर केलेल्या 'तुम्हे दिल्लगी' या गाण्यावर केलेला परफॉर्मेन्स पाहताना राजकुमार राव थक्क झाला. राजकुमारचा डान्स विषयीचा उत्साह पाहून श्रध्दा कपूर म्हणाली, “ राजकुमार हा स्पेशल अभिनेता आहे आणि तो नेहमीच काम करण्यासाठी उत्साही असतो. आपण सर्वांनी त्याचे अभिनय कौशल्य पाहिले आहे पण मला वाटते राजकुमार यांनी किशन आणि करन सोबत डान्स करावा. 

यावर राजकुमार म्हणाला, ''श्रध्दाचे डान्सिंग कौशल्य खूप चांगले आहे. ती इतकी सुंदर डान्स करते की तिची साथ जर मला मिळाली तर जास्त मजा येईल. श्रध्दा कपूरने त्याची ही विनंती मानली आणि त्या सर्वांनी त्याच गाण्यावर एकत्र डान्स केला आणि त्याला प्रेक्षकांनी टाळ्या वाजविल्या.

'स्त्री' सिनेमात श्रद्धा कपूर भूताच्या भूमिकेत दिसले तर राजकुमार राव पीडित ट्रेलरच्या भूमिकेत दिसणार आहे. पहिल्यांदाच राजकुमार श्रद्धासोबत स्क्रिन शेअर करणार आहे.  सिनेमाचे लेखन राज आणि डिकेने केले आहे. सिनेमाची निर्मिती डिनेश विजन, राज आणि डीके करणार आहेत. राज आणि डिके यांनी शोर इन द सिटी, गो गोआ गॉन आणि हॅप्पी एंडिंग सारख्या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. 31 ऑगस्टला श्रद्धा आणि राजकुमार राव प्रेक्षकांना घाबरवायला आणि हसावायला येणार आहेत.  

Web Title: Shraddha Kapoor accepted Rajkumar Rao's challenge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.