‘दिव्य दृष्टी’च्या सेटला दिली श्रेणु परिखने भेट !

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2019 06:21 PM2019-06-17T18:21:50+5:302019-06-17T18:27:51+5:30

दोन वेगवेगळ्या मालिकांमध्ये भूमिका साकारणारे कलाकार हे जेव्हा एकमेकांचे मित्र असतात आणि ते जेव्हा दुसर्‍्याला भेटण्यासाठी त्याच्या मालिकेच्या सेटवर जातात, तेव्हाचे दृष्य हे तसे दुर्मिळच असते.

Shrenu Parikh’s surprise visit on the sets of Divya Drishti | ‘दिव्य दृष्टी’च्या सेटला दिली श्रेणु परिखने भेट !

‘दिव्य दृष्टी’च्या सेटला दिली श्रेणु परिखने भेट !

googlenewsNext

दोन अतिशय लोकप्रिय मालिकांतील प्रमुख कलाकार वेळात वेळ काढून एकमेकांना भेटतात, तेव्हा ती भेट नक्कीच खास ठरते. ‘दिव्य दृष्टी’च्या सेटवर अलीकडे नुकतीच अशी महत्त्वपूर्ण भेट घडली. ‘एक भ्रम सर्वगुणसंपन्न’ या नव्या मालिकेत जान्हवी मित्तल या नायिकेची भूमिका साकाराणारी अभिनेत्री श्रेणु परिखने अनपेक्षितपणे याच वाहिनीवरील ‘दिव्य दृष्टी’ मालिकेच्या सेटला भेट दिली. 

दोन वेगवेगळ्या मालिकांमध्ये भूमिका साकारणारे कलाकार हे जेव्हा एकमेकांचे मित्र असतात आणि ते जेव्हा दुस-याला भेटण्यासाठी त्याच्या मालिकेच्या सेटवर जातात, तेव्हाचे दृष्य हे तसे दुर्मिळच असते. आताही तसेच घडले. श्रेणु परिखने ‘दिव्य दृष्टी’तील कलाकारांची अचानक भेट घेऊन त्यांना सरप्राईज दिले. त्यांच्याबरोबरच दुपारी जेवण करत मस्त  निवांत वेळही घालवला.  

 


आध्विक महाजन, मानसी श्रीवास्तव आणि नीरा बॅनर्जी यांच्याशी श्रेणूचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. सगळ्यांनी मिळून मस्त गुजराती जेवणाचा बेत आखला. त्यासाठी तिने आपल्या चित्रीकरणाच्या वेळापत्रकातून मुद्दाम वेळ काढला आणि आपल्या मित्रांसोबत काही काळ आनंदात घालवला तिच्या येण्याने सेटवर सर्वत्र एकदम आनंदाची लहर उठली आणि सर्वांनी तिचं स्वागत केलं. त्यांच्यात हास्यविनोद होत होते आणि सर्वांनी खूप धमाल केली.”


दरम्यान, ‘दिव्य दृष्टी’च्या प्रेक्षकांना बरेच अनपेक्षित धक्के बसणार आहेत. कारण दिव्याची भूमिका साकारणारी नीरा बॅनर्जी ही पिशाचिनी बनली आहे. त्यामुळे आगामी भागांमध्ये त्यांना भरपूर नाट्यपूर्ण प्रसंग पाहायला मिळतील.
 

Web Title: Shrenu Parikh’s surprise visit on the sets of Divya Drishti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.