"मायबाप प्रेक्षकांचे...." 'मृदगंध पुरस्कार' स्वीकारल्यानंतर श्रेया बुगेडेची पहिली प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2022 02:57 PM2022-11-29T14:57:50+5:302022-11-29T15:00:23+5:30

श्रेयाला नुकताच 'मृदगंध पुरस्कार' 2022 प्रदान करण्यात आला.

Shreya Bugede's first reaction after receiving 'Mridgandh Award' | "मायबाप प्रेक्षकांचे...." 'मृदगंध पुरस्कार' स्वीकारल्यानंतर श्रेया बुगेडेची पहिली प्रतिक्रिया

"मायबाप प्रेक्षकांचे...." 'मृदगंध पुरस्कार' स्वीकारल्यानंतर श्रेया बुगेडेची पहिली प्रतिक्रिया

googlenewsNext

श्रेया बुगडे (Shreya Bugde ) हे नाव आजच्या घडीला कोणत्याही व्यक्तीसाठी नवीन नाही. विनोदाच्या जगतात स्त्रीदेखील मागे नाहीत हे श्रेयाने दाखवून दिलं. त्यामुळे चला हवा येऊ द्या या कार्यक्रमामधील ती हुकमी एक्का असल्याचं पाहायला मिळतं. या शोच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली श्रेया सोशल मीडियावरही कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे बऱ्याचदा ती काही नवनवीन पोस्ट शेअर करत असते. सध्या श्रेया बुगडेची सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत आली आहे. 

श्रेयाला नुकताच  'मृदगंध पुरस्कार' 2022 प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार लोकशाहीर विठ्ठल उमप फाऊंडेशनतर्फे देण्यात येतो. पुरस्कार स्विकारतानाचे काही फोटो श्रेयाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तसेच हे फोटो शेअर करताना एक मोठी पोस्टही तिनं लिहिली आहे.

श्रेयाची पोस्ट 
काही काही क्षण मी कलाकार आणि माणूस म्हणून खूप नशीबवान असल्याची जाणीव करून देतात ...हा त्यापैकीं एक ....ह्या वर्षी चा १२ वा लोकशाहीर विठ्ठल उमप फाऊंडेशन चा 'मृदगंध'पुरस्कार' 2022'-नवोन्मेष प्रतिभा ' हा पुरस्कार मिळाला ..
लोकशाहीर विठ्ठल उमप यांसारख्या थोर कलाकाराच्या नावाने असलेल्या पुरस्काराबरोबर माझं नाव जोडलं गेलं , ज्याचा आनंद शब्दात मांडता येणार नाही !
व्यासपीठावर जे माझे सह पुरस्कर्ते होते त्याच्या बरोबर उभं सुद्धा राहण्यास मी स्वतःला पात्र समजत नाही .. पण नंदेश दादा सरिता वाहिनी तुमचे खूप आभार इतकं प्रेम आणि सन्मान दिल्याबद्दल
हा पुरस्कार मा .श्री सुधीर मुनगंटीवार. वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री, महाराष्ट्र राज्य व भारतीय जनता पार्टी चे नेते मा . श्री आशिष शेलार ह्यांच्या हस्ते देण्यात आला .
माझे सह पुरस्कर्ते
फ .मुं .शिंदे (जीवनगौरव )
पद्मश्री डॉ रवींद्र आणि स्मिता कोल्हे (सामाजिक क्षेत्र )
संजय मोने आणि सुकन्या मोने (अभिनय )
रवींद्र साठे (संगीत)
कमलाबाई शिंदे (लोककला)
ह्या सगळ्याचं श्रेय फक्त आणि फक्त तुम्हा रसिक मायबाप प्रेक्षकांचे आहे 
लोभ आहेच,तो वृद्धिगंत व्हावा !!

श्रेयाच्या या पोस्टवर सेलिब्रेटीसह चाहत्यांनी अभिनंदनचा वर्षाव केला आहे. तिची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होते आहे.  

Web Title: Shreya Bugede's first reaction after receiving 'Mridgandh Award'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.