लग्नानंतर बाईने पुरुषासोबत मैत्री करावी का ? श्वेता मेहेंदळे आणि यश प्रधान स्पष्टचं बोलले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2024 04:55 PM2024-07-16T16:55:12+5:302024-07-16T16:55:50+5:30

अभिनेत्री श्वेता मेहेंदळे आणि अभिनेता यश प्रधान यांनी स्त्री आणि पुरुष यांच्यातील मैत्रीवर भाष्य केलं. 

Shweta Mehendale and Yash Pradhan talk about woman and man's friendship | लग्नानंतर बाईने पुरुषासोबत मैत्री करावी का ? श्वेता मेहेंदळे आणि यश प्रधान स्पष्टचं बोलले

लग्नानंतर बाईने पुरुषासोबत मैत्री करावी का ? श्वेता मेहेंदळे आणि यश प्रधान स्पष्टचं बोलले

मैत्रीच्या नात्याला कशाचेही बंधन नसते. मैत्रीचं नातं म्हणजे जगातील एक सुंदर नात. यात ना वयाची मर्यादा असते, ना सीमेचं बंधन. पण, जर हीच मैत्री स्त्री आणि पुरुषाची असेल तर त्याकडे वेगळ्या नजरेनं पाहिलं जातं. पाहणारे या मैत्रीचा वेगळा अर्थ लावतात. यावर अभिनेत्री श्वेता मेहेंदळे आणि अभिनेता यश प्रधान यांनी भाष्य केलं.  स्त्री आणि पुरुष यांच्यातील मैत्रीवर त्यांनी आपलं स्पष्ट मत माडलं. 

यश प्रधान आणि श्वेतानं 'लोकमत फिल्मी'ला मुलाखत दिली. यावेळी लग्नानंतर बाईने पुरुषासोबत मैत्री करावी का ? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर  यश प्रधान म्हणाला, 'मैत्रीत पुरुष आणि स्त्री असा प्रश्नच मला पडत नाही. कारण आपण अभिनेते आहोत आणि शरीर हे आपलं साधन आहे. तर ही एक स्त्री आहे आणि उद्या मला हिला मीठी मारण्याचा काही सीन आहे. तर मग मला तेवढचं मोकळ राहावं लागतं आणि तिलाही तसंच राहावं लागतं. मी जेव्हा अभिनयाचे वर्कशॉप करत होतो. तेव्हा त्यांनी असा एक टास्क दिला होता. तेव्हा मला भीती वाटली होती.  तेव्हा त्यांनी अभिनयात शरीर हे साधन असून त्याचा तुम्हाला वापर करता आला पाहिजे असं सांगितलं. त्यामागे तु भावना, चूक आणि  बरोबर असं काही समजू नकोस. त्यामुळे मला आता असं वाटतं की अभिनेत्री किंवा अभिनेत्याला असे कुठलेच बंधनं नसावेत'. 

श्वेता मेहेंदळे म्हणाली,  'लग्नानंतर इंटिमेट सीन नाही करायचे असे बंधन मी घालून घेऊ शकत नाही. किंवा कोणीही घालणार नाही. तर खऱ्या आयुष्यातही तसंच आहे. एखादं नात शुद्ध असेल तर त्या नात्याला का द्यावं. नात्याला लेबल लावल्यावरचं ते समानजमान्य आहे असं का म्हणावं. आपल्या मैत्रीला समाज काही बोलेल म्हणून भाऊ माननं मला पटत नाही'.

पुढे यश म्हणाला, 'कोणी आपल्या काय समजेल ही आपली जबाबादारी नसून समोरच्या व्यक्ती आहे. तो त्याच्या मनातला गुंता आहे. दुसऱ्यांच्या संकुचीत मनामुळे सारखं स्पष्टीकरण देण गरजेच नाही. तो त्याचा प्रश्न आहे. तो प्रश्न त्याला सोडवू दे. तुम्ही फक्त सत्य वागा. समाजाची भीती बाळगू नका. त्यामुळे काहीही होणार नाही'. 

यश प्रधानच्या कामाबद्दल सांगायचं झालं, यापूर्वी तो ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेत झळकला होता. तर सध्या तो ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेत हर्षवर्धन म्हणजेच सावनीच्या प्रियकराची भूमिका साकारत आहे. या मालिकेत तो नकारात्मक भूमिकेत झळकत आहे.  तर श्वेता ही छोट्या पडद्यावर सध्या गाजत असलेली मालिका म्हणजे 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मध्ये काम करतेय. या मालिकेआधी श्वेतानं 'माझ्या नवऱ्याची बायको', 'नायक', 'या गोजिरवाण्या घरात', 'असावा सुंदर स्वप्नांचा बंगला' या मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. 

Web Title: Shweta Mehendale and Yash Pradhan talk about woman and man's friendship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.