Shweta Tiwari: श्वेता तिवारीने लेक पलक तिवारीला दिला लग्न न करण्याचा सल्ला, म्हणाली- माझा विश्वास....

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2022 05:01 PM2022-09-12T17:01:38+5:302022-09-12T17:07:59+5:30

श्वेता तिवारीने पहिले लग्न राजा चौधरीसोबत केले होते. श्वेताने 2007 मध्ये राजापासून घटस्फोट घेतला. त्यानंतर 2013 मध्ये तिनं अभिनव कोहलीसोबत लग्न केले, 2019 मध्ये श्वेता अभिनवपासून वेगळी झाली.

Shweta Tiwari advises daughter Palak Tiwari to not get married know why | Shweta Tiwari: श्वेता तिवारीने लेक पलक तिवारीला दिला लग्न न करण्याचा सल्ला, म्हणाली- माझा विश्वास....

Shweta Tiwari: श्वेता तिवारीने लेक पलक तिवारीला दिला लग्न न करण्याचा सल्ला, म्हणाली- माझा विश्वास....

googlenewsNext

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारी नेहमीच चर्चेत असते. अभिनेत्री तिच्या प्रोफेशनल आणि वैयक्तिक आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत आली आहे.  लवकरच तिचा नवीन शो 'मैं हूं अपराजिता'मधून टीव्हीवर परतणार आहे. या शोची कथा एका महिलेची जिने आपल्या तीन मुलींचा सिंगल मदर म्हणून संभाळ केला आहे. शोप्रमाणेच ती खऱ्या आयुष्यातही सिंगल मदर आहे. 

अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान श्वेता तिवारीने सांगितले की, दोन अयशस्वी लग्नानंतर तिचा लग्नाविषयीचा विचार पूर्णपणे बदलला आहे आणि तिने आपली मुलगी पलक तिवारीला लग्न न करण्याचा सल्लाही दिला आहे. श्वेता म्हणाली, 'माझा लग्नावर विश्वास नाही. मी माझ्या मुलीलाही लग्न करू नकोस असे सांगते. हे तिचं जीवन आहे, मी त्याला कसे जगायचे हे सांगत नाही, परंतु तिने निर्णय घेण्यापूर्वी चांगला विचार करावा असे मला वाटते.

पुढे श्वेता तिवारी म्हणाली, 'फक्त तुम्ही रिलेशनशिपमध्ये आहात म्हणून लग्न करण्याची गरज नाही.  प्रत्येक लग्न वाईट नसते. माझे बरेच विवाहित मित्र आनंदी आहेत, परंतु मी काही तडजोड देखील पाहिली आहे जी त्यांच्या आणि त्यांच्या मुलांसाठी चांगली नाही. म्हणूनच मी माझ्या मुलीला सांगू इच्छितो की तिने सामाजिक दबावाखाली काहीही करू नये, तिने तेच केले पाहिजे ज्यात तिला आनंद मिळेल.

श्वेता तिवारीने पहिले लग्न राजा चौधरीसोबत केले होते. त्यांचे लग्न फार काळ टिकले नाही आणि श्वेताने 2007 मध्ये राजापासून घटस्फोट घेतला. श्वेताने राजा यांच्यावर घरगुती हिंसाचार आणि मारहाणीचा आरोप केला होता. दोघांना एक मुलगी पलक तिवारी आहे. त्यानंतर 2013 मध्ये श्वेताने अभिनव कोहलीसोबत लग्न केले, दोघांनाही एक मुलगा रेयांश आहे. 2019 मध्ये श्वेता अभिनवपासून वेगळी झाली. आता ती दोन्ही मुलांची काळजी घेते. 
 

Web Title: Shweta Tiwari advises daughter Palak Tiwari to not get married know why

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.