वयाच्या १८व्या वर्षी या अभिनेत्रीनं केलं होतं लग्न, आता दुसरं लग्नही आहे धोक्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2019 09:00 PM2019-10-06T21:00:00+5:302019-10-06T21:00:00+5:30
ही अभिनेत्री हिंदी बिग बॉसच्या नवव्या सीझनमध्ये सहभागी झाली होती.
घराघरात प्रेरणाच्या नावानं लोकप्रिय झालेल्या श्वेता तिवारीने अभिनय क्षेत्रातील करियरची सुरूवात 'कलीरे'मधून केलं होतं. मुळची बिहारची असलेल्या श्वेता तिवारीने वयाच्या १८व्या वर्षी दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील निर्माता राजा चौधरीसोबत लग्न केले होते. श्वेताला सिनेइंडस्ट्री आपली ओळख निर्माण करण्यासाठी खूप मेहनत करावी लागली होती.
श्वेता तिवारी जेव्हा १२ वर्षांची होती तेव्हा ती ट्रॅव्हेली एजेंसीमध्ये जॉब करत होती. तिला फक्त ५०० रुपये महिन्याला मानधन मिळत होते. श्वेताला खरी ओळख २००१ साली कसौटी जिंदगी की मालिकेतून मिळाली. या मालिकेत तिने प्रेरणाची भूमिका केली होती.
२००४मध्ये पहिल्यांदा ती बिपाशा बासूची मुख्य भूमिका असलेला चित्रपट मदहोशीमध्ये झळकली होती. त्यानंतर तिने 'आबरा का डाबरा' आणि 'मिले न मिले हम' या चित्रपटात काम केले. तिने बऱ्याच भोजपुरी चित्रपटातही काम केलं आहे.
कसौटी जिंदगी की शिवाय श्वेता बिग बॉसच्या चौथ्या सीझनमध्ये पहायला मिळाली होती. श्वेताने खलीसारख्या अभिनेत्याला मागे टाकत ट्रॉफी जिंकली होती. सूत्रांच्या माहितीनुसार, श्वेताला बिग बॉससाठी आठवड्याला पाच लाखांचे मानधन दिले जात होते. बिग बॉसनंतर श्वेताने काही रिएलिटी शोचं सूत्रसंचालन केलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून श्वेता तिवारी चर्चेत असते. नुकतेच तिने दुसरा नवरा अभिनव कोहलीवर घरगुती हिंसेचा आरोप केला होता. ती म्हणाली होती की, अभिनवने मुलगी पलकला मारहाण केली होती. त्या दोघांच्या नात्यात दुरावा आला असून ते विभक्त होण्याच्या वाटेवर आहे. श्वेताने तिचा पहिला नवऱ्यासोबतही याच कारणामुळे घटस्फोट घेतला होता.
कायदेशीररित्या श्वेता व राजाचा घटस्फोट २०१२ मध्ये झाला होता. श्वेताला दोन मुले आहेत. पहिला नवरा राजा चौधरीपासून श्वेताला एक मुलगी आहे. जिचं नाव पलक आहे. अभिनवपासून एक मुलगा आहे ज्याचं नाव रेयांश कोहली आहे.