बाथरोबमध्ये श्वेता तिवारीनं केला 'बेशरम रंग'वर डान्स, व्हिडीओ होतोय व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2023 15:58 IST2023-01-17T15:57:48+5:302023-01-17T15:58:35+5:30
Shweta Tiwari Instagram: श्वेता तिवारी तिच्या ग्लॅमरस लुक्समुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. अभिनेत्रीने नुकताच 'पठाण' चित्रपटातील वादग्रस्त 'बेशरम रंग' या गाण्यावर एक लेटेस्ट व्हिडिओ शेअर केला आहे.

बाथरोबमध्ये श्वेता तिवारीनं केला 'बेशरम रंग'वर डान्स, व्हिडीओ होतोय व्हायरल
टीव्हीवरील सर्वात बोल्ड आणि लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारी(Shweta Tiwari)ने सोशल मीडियावर खळबळ उडवली आहे. अभिनेत्रीचा एक लेटेस्ट व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये ती शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांच्या आगामी चित्रपट 'पठाण' मधील वादग्रस्त गाणे 'बेशरम रंग'वर नाचताना दिसत आहे.
'कसौटी जिंदगी की' मालिकेत 'प्रेरणा' बनून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी श्वेता तिवारी इंस्टाग्रामवर खूप सक्रिय असते. वयाच्या ४२ व्या वर्षीही श्वेता तिवारीने स्वतःला खूप फिट ठेवले आहे. ती तिच्या ग्लॅमरस फोटोशूट आणि व्हिडिओंमुळे चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे. फॅशन आणि स्टाईल आणि फिटनेसच्या बाबतीतही श्वेताची बरोबरी नाही.
आता श्वेताने इन्स्टाग्रामवर तिचा एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये ती 'बेशरम रंग' गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. अभिनेत्रीच्या या व्हिडीओला चाहत्यांची पसंती मिळते आहे. पांढऱ्या रंगाच्या बाथरोबमध्ये श्वेता खूपच मस्त दिसत आहे. व्हिडिओमध्ये, ती पिवळ्या पँट-सूटमध्ये 'बॉस लेडी' स्टाईलमध्ये बदलते. अभिनेत्रीची किलर स्टाईल पाहून चाहते घायाळ झाले आहेत.
व्हिडिओ शेअर करताना श्वेताने एक मजेशीर कॅप्शन दिले आहे. तिने लिहिले, 'जेव्हा ते मला १००० वेळा विचारतात की तुला तयार होण्यासाठी किती वेळ लागेल, तेव्हा मी अशा प्रकारे तयार होते.'